विकासकामांसाठी सर्वांना सोबत घेवून प्रयत्न करणार: खा.बजरंग सोनवणे
गप्पेवाडी, गौरवाडी, विड्यात विविध विकास कामांचे उद्घाटन

केज ! प्रतिनिधी

 

ग्रामीण भागात अनेक विकास कामे करणे आवश्यक आहे. अजूनही ग्रामीण भागात चांगल्या सुविधा मिळू शकत नाहीत. येणाऱ्या काळात आपल्याला आवश्यक ती विकास कामे करायची असून त्यासाठी सर्वांना सोबत घेवून विकासकामे करण्याचा प्रयत्न करणार आहे, असे प्रतिपादन खा.बजरंग सोनवणे यांनी केले.
खा.बजरंग सोनवणे यांच्या माध्यमातून केज तालुक्यातल विडा आणि गप्पेवाडी, गौरवाडी येथे विविध विकास कामांचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. गप्पेवाडी येथील कार्यक्रमाला माजी आ.पृथ्वीराज साठे, पंचायत समितीचे माजी सभापती ज्ञानेश्वर चौरे, पंचायत समितीचे सदस्य पिंटू ठोंबरे, तालुका अध्यक्ष शंकर जाधव, विलास जोगदंड, अर्जुन केदार, अशोक केदार, पांडुरंग केदार, संतोष केदार यासह ग्रामस्थांची उपस्थिती होती. तर विडा येथील कार्यक्रमाला माजी आ.पृथ्वीराज साठे, श्रीराम महाराज विडेकर, सुदाम महाराज शास्त्री, संजय महाराज शिरुरकर, पंचायत समितीचे सभापती ज्ञानेश्वर चौरे, पंचायत समिती सदस्य पिंटू ठोंबरे, तालुका अध्यक्ष शंकर जाधव, सरपंच सुरज पटाईत, उपसरपंच सदाशिव वाघमारे, उधव देशमुख, दिलीप पटाईत, उद्धव पटाईत, बाबासाहेब पटाईत, रणजित, गुट्टे, दत्ता गुट्टे, जानमिया शेख आदी मान्यवर उपस्थित होते. तर गौरवाडी येथील विकास कामांच्या उद्घाटन कार्यक्रमास कार्यकारी अभियंता एम.एम पाटील, उपअभियंता के.बी शेख, बंडू चौधरी, रुपेश बोरगावकर, डॉ.संतोष ढाकणे, तानाजी घाडगे, विनोद घाडगे, महादेव घाडगे, प्रकाश रोमन, आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी पुढे बोलताना खा.बजरंग सोनवणे म्हणाले, या दोन्ही गावातील नागरिकांनी माझ्यावर मोठा विश्वास मतातून दाखविलेला आहे. आज तुमच्याच आशीर्वादाने मी सभागृहात जावू शकलो. तुम्ही तुमची जबाबदारी पुर्ण केली असून आता मी माझाी जबाबदारी पुर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे. येणाऱ्या काळात या भागाच्या विकासासाठी मला जे जे करावे लागेल ते मी करेल. ग्रामीण भागात विकास कामे करायला मोठी संधी आहे. याच संधीचे सोने आपण करू आणि विकास कामांसाठी सर्वांना सोबत घेवून कामे करू, असेही ते म्हणाले.

संपादक दशरथ चवरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *