युसुफवडगाव ठाण्यातील सय्यद अमजद यांची सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकपदी पदोन्नती
प्रतिनिधी ! केज
तालुक्यातील युसुफवडगाव पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले सय्यद अमजद सय्यद मीर यांची सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकपदी पदोन्नती झाली आहे. त्याबद्दल त्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन केले जात आहे.
सय्यद अमजद यांच्याकडे पोलीस स्टेशन अंतर्गत होळ बीटची जबाबदारी आहे. त्यांनी आतापर्यंत पोलीस खात्यात उत्तम सेवा बजावली आहे. जिल्हा पोलीस दलातील ११ पोलीस हवलदारांना सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नती देण्यात आली आहे. यामध्ये सय्यद यांचा समावेश आहे. पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी दि.४ मार्च रोजी पदोन्नतीचे आदेश काढले. सय्यद यांना पदोन्नती मिळाल्याबद्दल युसुफवडगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मच्छिंद्र शेंडगे यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.
