साबला गाव पाणीदार करण्यासाठी ART संस्था यवतमाळ यांनी घेतला पुढाकार .

केज – प्रतिनिधी .

केज तालुक्यातील साबला गाव हे नेहमी कोणत्यानं कोणत्या कारणानं चर्चेत असतं . त्यातचं आता साबला या गावात भर पडली . ती म्हणजे पाणी टंचाईची . बऱ्याच वर्षापासून या गावाला पाणी टंचाईचा सामना करावा लागतो . याची दखल ही जिल्हा यवतमाळ येथील ” ART ॲक्शन रुरल टॅक्नॉलॉजी संस्था ” यवतमाळ . या संस्थेचे संस्थापक / अध्यक्ष माननीय सुहासराव धस , जलसंधारण तज्ञ पवनराव नखाते , प्रकल्प व्यवस्थापक माननीय वली तांबोळी , प्रकल्प सहाय्यक श्रीमती ज्योतीताई सांबरे यांनी पुढाकर घेऊन केज तालुक्यातील साबला हे गाव दत्तक घेतले आहे . आणि या गावाला टॅकर मुक्त करण्यासाठी या गावाची निवड केली आहे . साबला या गावाच्या परिसरातील लहान ओढे , नाले , नद्या यातील गाळ काढून त्याचे रूंदीकरण करणे , त्यामध्ये पाणी अडवण्यासाठी बॉक्स बनवणे . पाऊस पडल्यानंतर पावसाचे पाणी जमिनीत मुरले पाहिजे . म्हणजे यानंतरच्या पुढील काळात या गावातील नागरिकांना तसेच , पशु , पक्षी , प्राणी यांना पाण्याची कसलीही अडचण येणार नाही . यासाठी सर्वोतरी सहकार्य करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत .
या कामाचा शुभारंभ उपसरपंच श्रीमती कचराबाई राजेंद्र सरवदे , समाजसेवक नरहरी काकडे , ग्रामपंचायत अधिकारी माननीय धनराज सोनवणे , चेरमण उत्तमराव काकडे , माजी सरपंच मधुकर काकडे , माजी सरपंच महादेव कटारे , ग्रामरोजगार सेवक दत्तकुमार काकडे , ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर पांचाळ , पोपट काकडे , मेजर बबनराव मुळे , माजी ग्रामपंचायत सदस्य रामराजे शिंदे , श्रीमंत नाईकनवरे , आश्रुबा काकडे , सेवा सहकारी सोसायटी संचालक सदाशिव काकडे , तसेच बाबुराव काझी , पवन सरवदे , जालींदर मुळे , अनिल भोसले , संजिवन नाईकनवरे , सुदामराव राऊत , रामभाऊ काकडे , गोरख काकडे , बप्पा काकडे , तात्याराम मुळे , विश्वनाथ नाईकनवरे , उत्तमभाऊ काकडे , राजेभाऊ काकडे , विलास काकडे , जगन्नाथ काकडे , सुभाषराव काकडे , गुलाब मुळे , राम काकडे , सावताराम नाईकनवरे , सुदामराव नाईकनवरे इत्यादी गाववकऱ्यांच्या उपस्थितीत या कामाचा शुभारंभ करण्यात आला .

संपादक दशरथ चवरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *