केज ! प्रतिनिधी
परिसरातील दुष्काळी परिस्थितीची तीव्रता लक्षात घेऊन कोणताही भपका किंवा गाजावाजा न करता अत्यंत साधेपणाने व सामाजिक भान जपत मा. श्री. नंदकिशोर (काकाजी) मुंदडा यांच्या वाढदिवसानिमित्त ‘अमृततुल्य कीर्तन सेवा व अन्नदान सेवा’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. भाजप सरचिटणीस सुनील भाऊ घोळवे, समस्त गावकरी व परिसरातील भाविक मंडळींच्या वतीने या धार्मिक व सामाजिक कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे.
हा विशेष उपक्रम रविवार, दि. १८ ऑक्टोबर २०२६ रोजी आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यात सायंकाळी ०८ ते १० या वेळेत ह.भ.प. श्री. बाळू महाराज गिरगावकर यांचे सुश्राव्य कीर्तन होणार आहे. या कीर्तन सेवेसाठी संगीतसाथ म्हणून भजन सम्राट किशोर महाराज येडे, गायनाचार्य सुनील महाराज सारुक, मृदंग विशारद तुळशीराम महाराज उबाळे, मृदंग विशारद प्रवीण महाराज यादव, मृदंग विशारद गणेश महाराज भोसले आणि गायनाचार्य सखाराम महाराज धस यांची साथ लाभणार आहे.
याचबरोबर, भाविकांसाठी दुपारी ०४ ते सायंकाळी ०८ या वेळेत महाप्रसादाच्या (अन्नदान) भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.
वेळ (कीर्तन): रविवार, दि. १८ ऑक्टोबर २०२६, सायंकाळी ०८ ते १० वाजता
भोजन (अन्नदान) वेळ: दुपारी ०४ ते सायंकाळी ०८ वाजेपर्यंत
ठिकाण: मुंडेवाडी, ता. केज, जि. बीड
आयोजक: सुनील भाऊ घोळवे (सरचिटणीस, भाजप), समस्त गावकरी व परिसरातील भाविक मंडळी
दुष्काळी परिस्थितीचे भान ठेवून आयोजित करण्यात आलेल्या या आध्यात्मिक व सामाजिक उपक्रमास मुंडेवाडीसह परिसरातील सर्व भाविक भक्तांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक सुनील भाऊ घोळवे व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.
