केज शहरात ईकेवायसी कॅम्पचा शिधापत्रिका धारकांनी लाभ घ्यावा-श्रीमती सुजाता रामटेके

केज प्रतिनिधी

अंत्योदय अन्य योजना व प्राधान्य कुटुंब योजनेअंतर्गत येणाऱ्या लाभार्थ्यांनी ईकेवायसी करून घ्यावी. त्याचबरोबर केज शहरात चार दिवस ईकेवायसी करण्यासाठी कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे तरी केज शहरातील आणि ग्रामीण भागातील शिधापत्रिका धारकांनी या कॅम्पचा लाभ घ्यावा असे आवाहन पुरवठा निरीक्षण अधिकारी श्रीमती सुजातारामटेके यांनी केले आहे.

याबाबतची सविस्तर माहिती अशी की, अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब योजनेअंतर्गत येणाऱ्या लाभार्थ्यांची ही केवायसी करण्यासाठी केज तहसील पुरवठा विभागाच्या वतीने ईकेवायसी करण्यासाठी दिनांक ४ मार्च ते ७ मार्च या ४ दिवसांच्या

शिधापत्रिका धारकांनी ईकेवायसी तात्काळ करून घेण्यात यावी असे पुरवठा विभागाच्या वतीने केले आवाहन

कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे या कॅम्पमध्ये ज्या शिधापत्रिका धारकांना शासनाच्या वरील दोन योजनेअंतर्गत अन्नधान्य (माल) मिळत आहे अशा लाभधारकांनी या कॅम्प मध्ये सहभागी होऊन सदर योजनेचा लाभ घ्यावा असे केज तहसील पुरवठा निरीक्षण अधिकारी श्रीमती सुजाता रामटेके यांनी केले आहे. या कॅम्पमध्ये शेतकरी योजनेतील

शिधापत्रिकाधारकांनी सहभाग घेऊन नये असे पुरवठा विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

सदर कॅम्पचे आयोजन दिनांक ४ मार्च २०२५ रोजी आदर्श प्राथमिक शाळा, शुक्रवार पेठ, केज येथे सकाळी ठीक १० ते दुपारी २ वाजेपर्यंत दुपारी ३ ते सायं. ५ वाजेपर्यंत, दिनांक ५ मार्च २०२५ रोजी श्री दत्त मंदि, मंगळवार पेठ, केज सकाळी ठीक १० ते दुपारी २ वाजेपर्यंत

दुपारी ३ ते सायं. ५ वाजेपर्यंत, दिनांक ६ मार्च २०२५ रोजी हनुमान मंदिर, वकीलवाडी, केज सकाळी १० ते दुपारी २ पर्यंत दुपारी ३ ते सायं. ५ पर्यंत, दिनांक ७ मार्च २०२५ रोजी जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक शाळा, रोजा मोहल्ला, केज सकाळी ठीक १० ते दुपारी २ ददुपारी ३ते सायं. ५ वाजेपर्यंत या चार दिवसांमध्ये ईकेवायसी करण्यासाठी केज तहसील पुरवठा विभागाच्या वतीने आयोजन करण्यात आले आहे. तरी या कॅम्पमध्ये जास्तीत जास्त शिधापत्रिका धारकांनी लाभघ्यावा असे आवाहन करण्यात

आले आहे. जर शिधापत्रिकाधारकांनी ईकेवायसी केली नाही तर भविष्यामध्ये त्या लाभधारकांचे नाव शिधापत्रिका मधून

वगळण्यात येईल व अशा शिधापत्रिकाधारकांना शासनाच्या योजनेचा लाभ घेता येणार नाही. या सर्व बाबीची सर्वस्वी जबाबदारी ही शिधापत्रिका धारकांची राहील याची सर्व शिधापत्रिका धारकांनी नोंद घेण्यात यावी असे माध्यमाशी बोलताना पुरवठा विभागाच्या वतीने पुरवठा निरीक्षण अधिकारी श्रीमती सुजाता रामटेके यांनी सांगितले आहे.

सदर कॅम्प मध्ये केज शहरातील सर्व रेशन दुकानदार हे ईकेवायसी करण्यासाठी ईकेवायसी मशीन घेऊन कॅम्प मध्ये सहभागी होणार आहेत. त्याचबरोबर तहसील कार्यालय याच्या वतीने पुरवठा विभागाचे अधिकारी व कर्मचारी हे देखील भेट देऊन कामाची पाहणी करणार आहेत.

संपादक दशरथ चवरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *