ऊसतोड मजुरांची मुलगी जिद्द मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर झाली पोलीस
केज! प्रतिनिधी
केज तालुक्यातील सोनिजवळा येथील इतिहासातील पहिलीच महिला पोलिस म्हणून अत्यंत गरीब कष्टकरी ऊसतोड मजुरांची मुलगी सबीया निजाम शेख हिची मुंबई पोलीस म्हणून निवड झाली
या बाबत सविस्तर वृत्त असे की केज तालुक्यातील सोनिजवळा येथील अत्यंत गरीब कष्टाळू मेहनती शेख निजाम हजी महंमद यांची मुलगी सबीया हिचे पहिली ते सातवी पर्यंतचे शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोनिजवळा व आठवी ते दहावी स्वामी विवेकानंद माध्यमिक विद्यालय सोनिजवळा येथे शिक्षण झाले आणि यश मिळवायचं असेल तर परीस्थितीच भांडवल न करता जिद्द,मेहनत, आणि चिकाटीच्या जोरावर स्वप्न साकार करता येतात याचाच प्रत्यय सोनिजवळा येथील सबीया शेख हिने प्रतिकुल परीस्थितीशी झगडत अखेर यश मिळवत मुंबई पोलीस दलात निवड झाली आहे, आई टेलरिंग काम व वडील ऊसतोडणीचे काम करत आहे तेथेच मुलगी पोलिस दलात निवड झाल्याचे समजताच वडीलांचा आनंद गगनात मावेनासा झाला कुटुंबाच्या कष्टांना योग्य न्याय मिळाला आहे, सबीया च्या या उल्लेखनीय यशाबद्दल तिच्या वडीलांचा उसाच्या फडात पेडा भरुन माजी सरपंच मुकुंद गायकवाड यांनी अभिनंदन केले तसेच गावच्या वतीने ज्या शाळेत पहिली ते सातवी पर्यंत शिक्षण घेतले त्या शाळेमध्ये तीचा सत्कार करण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच गोविंद ससाणे, प्रमुख पाहुणे हनुमंत भोसले, ज्ञानदीप अकॉडमीचे संचालक दराडे सर, मिनाज पठाण(अंबा साखर डायरेक्टर ग्रा प सदस्य), माजी सरपंच मुकुंद गायकवाड, उपसरपंच दादासाहेब कोकाटे,शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष दशरथ चवरे, वैजनाथ गायकवाड, चेअरमन मनोज गिरी, व्हा चेअरमन हुसेन पठाण, तंटामुक्त अध्यक्ष शंकर ससाणे, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक गुंड सर, दौंड सर, सावंत सर, काळे सर, सांगळे सर, जावळे सर, नवले मॅडम पवार मॅडम, गिरी मॅडम , रुस्तुम पटेल साहब,फतरू शेख साहब, देविदास जोगदंड ग्रामपंचायत सदस्य, युनुस शेख, जैनुद्दीन शेख, जावेद शेख, सत्तर शेख, हजी मोहंमद शेख,हाजी आसेफ पटेल गावातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन मिनाज पठाण यांनी केले तर आभार आसेफ पठाण यांनी मानले
