ऊसतोड मजुरांची मुलगी जिद्द मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर झाली पोलीस

अंबाजोगाई साखर कारखान्याचे चेअरमन रमेशराव आडसकर यांनी केला सबीया शेख चा सत्कार

केज! दशरथ चवरे

केज तालुक्यातील सोनिजवळा येथील इतिहासातील पहिलीच महिला पोलिस म्हणून अत्यंत गरीब कष्टकरी ऊसतोड मजुरांची मुलगी सबीया निजाम शेख हिची मुंबई पोलीस म्हणून निवड झाली, या निवडीसाठी अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन रमेशराव आडसकर यांनी सोनिजवळा येथे येऊन सबीया चा सत्कार केला पुढे बोलताना रमेशराव आडसकर म्हणाले की या गावातुन अनेक सबीया सारख्या मुली अधिकारी व्हाव्यात तरुण पिढीनी पुढे येऊन चांगले कार्य करावे, कुणाचे नाव न घेता बर्याच राजकीय कोपर खिळ्या मारल्या व पुढील वाटचालीसाठी‌सबीयाला शुभेच्छा दिल्या,

या बाबत सविस्तर वृत्त असे की केज तालुक्यातील सोनिजवळा येथील अत्यंत गरीब कष्टाळू मेहनती शेख निजाम हजी महंमद यांची मुलगी सबीया हिचे पहिली ते सातवी पर्यंतचे शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोनिजवळा व आठवी ते दहावी स्वामी विवेकानंद माध्यमिक विद्यालय सोनिजवळा येथे शिक्षण झाले आणि यश मिळवायचं असेल तर परीस्थितीच भांडवल न करता जिद्द,मेहनत, आणि चिकाटीच्या जोरावर स्वप्न साकार करता येतात याचाच प्रत्यय सोनिजवळा येथील सबीया शेख हिने प्रतिकुल परीस्थितीशी झगडत अखेर यश मिळवत मुंबई पोलीस दलात निवड झाली आहे, आई टेलरिंग काम व वडील ऊसतोडणीचे काम करत आहे तेथेच मुलगी पोलिस दलात निवड झाल्याचे समजताच वडीलांचा आनंद गगनात मावेनासा झाला कुटुंबाच्या कष्टांना योग्य न्याय मिळाला आहे, सबीया च्या या उल्लेखनीय यशाबद्दल तिच्या वडीलांना आईला व कुटुंबातील सर्वांना आनंद ‌झाला , अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन रमेशराव आडसकर यांना माहीत झाले की सोनिजवळा येथील एका कष्टकरी कुटुंबातील मुलगी पोलिस दलात निवड झाली आणि सोनिजवळा येथे येऊन सबीया शेख हिची सत्कार केला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच गोविंद ससाणे, प्रमुख पाहुणे अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन रमेशराव आडसकर, मिनाज पठाण(अंबा साखर डायरेक्टर ग्रा प सदस्य), माजी सरपंच मुकुंद गायकवाड, उपसरपंच दादासाहेब कोकाटे,शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष दशरथ चवरे, चेअरमन मनोज गिरी, व्हा चेअरमन हुसेन पठाण, गावातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन मिनाज पठाण यांनी केले तर आभार मुकुंद गायकवाड यांनी मानले

संपादक दशरथ चवरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *