संतोष देशमुखांच्या पत्नीला रमेशराव आडसकरांनी दिले नोकरीच नियुक्ती पत्र

विशेष बाब म्हणून शासनाने दिली पद भरतीस मान्यता

केज ! प्रतिनिधी

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांना आडस ता. केज येथील श्री. छत्रपती शिवाजी शिक्षण संस्था संचलित छ्त्रपती शिवाजी विद्यालयात कनिष्ठ लिपिक पदावर नियुक्ती देण्यात आली आहे. शासनाने विशेष बाब म्हणून त्यांच्या या पद भरतीस मान्यता दिली असून संस्थेचे सचिव रमेश आडसकर व राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश्वर चव्हाण यांनी मस्साजोग येथे जाऊन त्यांना नियुक्तीपत्र सुपूर्द केले.

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडा नंतर त्यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांना शासकीय सेवेत सामावून घ्यावे. अशी ग्रामस्थांची आणि विविध स्तरातून मागणी केली होती. त्या नुसार राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिक्षण संस्थेतील नोकरी बंद असल्याने विशेष बाब म्हणून पद भरतीसाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देऊन देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांना छ्त्रपती.शिक्षण संस्था आडस संचलित श्री. छत्रपती शिवाजी विद्यालयात कनिष्ठ विद्यालय आडस येथे लिपिक पदावर नियुक्ती देण्यात आली आहे.
त्यांना सुरुवातीचे तीन वर्षे परिविक्षाधीन कालावधीसाठी त्यांना प्रती महिना १० हजार रु. मानधन देण्यात येणार असून त्या नंतर मूळ वेतनश्रेणी दिली जाणार आहे.
शुक्रवार दि. १४ फेब्रुवारी रोजी श्री. छत्रपती शिक्षण संस्थेचे सचिव रमेश आडसकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश्वर चव्हाण यांनी मस्साजोग येथे जाऊन अश्विनी देशमुख यांना नियुक्तीपत्र सुपूर्द केले. यावेळी रमेशराव आडसकर, राजेश्वर देशमुख आणि देशमुख यांच्या मातोश्री शारदाताई देशमुख, भाऊ धनंजय देशमुख, माजी उपसभापती ऋषिकेश आडसकर, केजचे उपनगराध्यक्ष पशुपतीनाथ दांगट, दिलीप गुळभिले, चिंचोली माळीचे सरपंच सुनील देशमुख, साळेगावचे सरपंच कैलास जाधव, सारणी (आ.) चे सरपंच संतोष सोनवणे, रंजित आडसकर हे उपस्थित होते.

—————————————————–

मदितीचा धनादेश :- या वेळी रमेश आडसकर यांनी देशमुख कुटुंबीयांना नोकरीच्या नियुक्ती पत्रा सोबतच ५ लाख ५५ हजार रु. चा मदतीचा धनादेश देखील सुपूर्त केला.
—————————————————

संपादक दशरथ चवरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *