बस मध्ये चढत असताना खिसा कापला ३० हजार रू. लंपास

केज !प्रतिनिधी

पत्नीला घेवून औषधोपचारासाठी अंबाजोगाई येथे जात असताना केज येथून बसमध्ये चढत असताना पँटचा खिसा करपून तीस हजार रु. अज्ञात चोरट्याने लंपास केले आहेत. या बाचतची माहिती अशी की, दि. १२ फेब्रुवारी रोजी अमोल चिंतामण डोंगरे (रा. सुडी थोट ता. जि. बीड) हे औषधोचारासाठी त्यांच्या पत्नीला अंबाजोगाई येथील दवाखान्यात घेवून जात असताना दुपारी ४:३० वाजण्याचे सुमारास ते त्यांची पानी एक नातेवाईक महिला हे केज बस स्थानकातून पुणे-अंबाजोगाई बसमध्ये चदत असताना गर्दीचा फायदा घेवून त्यांच्या पॅटच्या वॉचपकिट मध्ये ठेवलेले तीस हजार रु. अज्ञात चोरट्याने खिसा कापून लंपास केले. बसमध्ये चढल्या नंतर त्यांचा खिसा कापल्याचे लक्षात आले. अमोल डोंगरे यांच्या तक्रारीवरून केंज पोलीस ठाण्यात गु. र. नं. ६१/२०२५ मा. न्या. सं. ३०३(२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस हेडकॉन्स्टेबल श्रीकांत चौधरी हे तपास करीत आहेत.

संपादक दशरथ चवरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *