शिवजन्मोत्सवानिमित्त उमरीत बैलगाडा शर्यतीचे आयोजन

माजलगांव । प्रतिनिधी

तालुक्यातील उमरी येथे दरवर्षी प्रमाणे यंदाही शिवजन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यामध्ये बैलगाडा शर्यत, आरोग्य शिबिर, पालखी सोहळा यासह विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यावर्षी शिवजयंतीचे आकर्षण बैलगाडा शर्यत होणार असून या बैलगाडा शर्यतीत विजेत्यांना रोख बक्षिसे मिळणार आहेत. या बैलगाडा शर्यतीत बैलगाडा प्रेमींनी भाग घ्यावा असे आवाहन सार्वजनिक शिवजन्मोत्सव समिती उमरी

(बु.) यांनी केले आहे. तालुक्यातील उमरी येथील शिवजन्मोत्सव आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. यावर्षी शिवजयंतीचे सातवे वर्षे असून यामध्ये बैलगाडा शर्यत विशेष आकर्षण ठरणार आहे. बैलगाडा शर्यत ओपन मैदानावर (दि.१७) फेब्रुवारी रोजी खेळली जाणार आहे. यामध्ये बैलगाडा शर्यतीत प्रथम येणाऱ्या विजेत्यास आसाराम घायतिडक ३१,१३१ रु. द्वितीय बक्षीस बैलगाडा शर्यत आयोजक कमेटी २१,१२१, तिसरे महादेव माने ११,१११,

चौथे बक्षीस पत्रकार वैजनाथ घायतिडक ९९९९, पाचवे

बक्षीस ज्ञानेश्वर घायतिडक ७७७७, सहावे बळीराम घायतिडक ५५५५, सातवे बक्षीस मथुरदास घायतिडक

४४४४ रू. आठवे बक्षीस नितीन घायतिडक ३३३३ रु. ची अशी रोख बक्षिसे दिली जाणार आहेत. बैलगाडा शर्यतीमध्ये भाग घेणाऱ्यासाठी प्रवेश फीस ७९९ रुपये राहणार असुन स्पर्धेत भाग घेणाऱ्या बैलगाडा प्रेमींनी लाभ घ्यावा असे आवाहन सार्वजनिक शिवजन्मोत्सव समिती उमरी यांच्या वतीने केले आहे.

आरोग्य शिबीराचेही आयोजन

शिवजन्मोत्सवा निमित्त काशी विश्वनाथ चॅरिटेबल ट्रस्ट व
सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा समिती च्या संयुक्त विद्यमाने रविवार (दि.१६) रोजी आरोग्य शिबीर होणार आसुन या शिबीरात जिल्ह्यातील नामवंत डॉक्टर सहभागी होणार आहेत. या शिबीरात रक्तदान ही होणार आहे. बुधवार (दि.१९) रोजी ढोल ताशांच्या गजरामध्ये पालखी सोहळा मिरवणूक होणार आहे. शिवजन्मोत्सवानिमित्त होणाऱ्या कार्यक्र माचा तालुक्यातील शिवप्रेमींनी लाभघ्यावा असे आवाहन शिवजन्मोत्सव समिती उमरी (बु.) यांनी केली आहे.

संपादक दशरथ चवरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *