पाणी पुरवठा सुरळीत करा अन्यथा आंदोलन करणार – मिनाज पठाण
केज! प्रतिनिधी
केज तालुक्यातील सोनिजवळा येथे गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून बारा गाव पाणी पुरवठा करणारी धनेगाव पाणीपुरवठा पाईप लाईन बंद असल्यामुळे सोनिजवळा गावातील महिलांना, वृध्दांना, पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे धरण उशाला अंन कोरड घशाला आशी म्हणण्याची वेळ सोनिजवळा येथील नागरिकांवर आली आहे. यावर्षी चांगला पाऊस झाला धरण शंभर टक्के भरले परंतु प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे सोनिजवळा सह ईतर गावातील नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे या झोपी गेलेल्या प्रशासनाला व पाणीपुरवठा करणार्या यंत्रणानेला जग करण्यासाठी आंदोलन करण्याची गरज पडत आहे . यंत्रणा खरच झोपली आहे की झोपेच सोंग करत आहे हे मात्र समजण्या पलीकडचे आहे उन्हाळा सुरू होण्याच्या सुरवातीला जर ही परिस्थिती आसेल तर भर उन्हाळ्यात कल्पना करणे सुध्दा अवघड आहे. या करता सोनिजवळा ग्रामपंचायत सदस्य तथा अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याचे संचालक मिनाज पठाण यांनी येत्या दोन ते तीन दिवसांत धनेगाव पाणीपुरवठा पाईप लाईन सुरळीत करण्यात यावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा पाणीपुरवठा विभागाला दिला आहे
