विकासाला प्राधान्य देत केजच्या मतदारांनी दिला पुन्हा एकदा नमिता मुंदडा यांना कौल ; अतीतटीच्या लढती २६८७ मताने विजयी
अंबाजोगाई ! प्रतिनिधी
केजच्या मतदारांनी विकासाला प्राधान्य देऊन पुन्हा एकदा आपला विजयी कौल भाजपा महायुतीच्या उमेदवार नमिताताई मुंदडा यांच्या बाजूने कौल देऊन त्यांना विधानसभेत पाठवले आहे विधानसभा निवडणुकीत भाजप महायुतीच्या उमेदवार आ.नमिताताई मुंदडा या १ लाख १५ हजार ६८९ मते घेऊन विजयी झाल्या.
केज विधानसभा मतदारसंघात आ.नमिताताई मुंदडा व माजी आ. पृथ्वीराज साठे अशी सरळ लढत झाली. या निवडणुकीत सर्व प्रमुख पक्षाचे नेते अन् कार्यकर्ते मुंदडांच्या विरोधात होते. विरोधकांच्या खोट्या प्रचाराला व भुलथापांना बळी न पडता सुजाण मतदारांनी आ.नमिता मुंदडा यांनी मागील ५ वर्षांत मतदारसंघात करोडो रुपयाची विकासकामे केली. या कामांमुळे सामान्य मतदार मात्र विकासाच्या मुद्यांवर मुंदडांच्या पाठीमागे भक्कमपणे उभा होत हे या निकालातून पुन्हा स्पष्ट झाले आहे. या लढतीत २,६८७ मतांची आघाडी घेऊन नमिता मुंदडा या विजयी झाल्या आहेत. केज विधानसभा मतदार संघात मतमोजणी प्रक्रियावेळेस कुठेही अनुचित प्रकार घडला नाही.
केज विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत विद्यमान भाजप महायुतीच्या उमेदवार नमिता अक्षय मुंदडा यांनी विजय संपादन केला.
यावेळी बोलताना आ.नामिताताई मुंदडा म्हणाल्या की, केज विधानसभा मतदारसंघातील जनतेने पुन्हा आम्ही केलेल्या विकासकामांना पुन्हा पसंती दिली. व मतदानरूपी आशीर्वाद दिले. निवडणूक प्रचार प्रक्रिया गतिमान करण्यासाठी मला ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन व युवा नेते अक्षय मुंदडा यांची भक्कम साथ लाभली. त्यामुळे भाजपा महायुतीच्या विजयासाठी ज्यांनी ज्यांनी मदत, सहकार्य करून आशिर्वाद दिले. असल्याचे सांगून आ. नामिताताई मुंदडा यांनी केज मतदारसंघातील सर्व जनतेचे त्यांनी जाहीर आभार व्यक्त केले आहेत.
*केज मतदारसंघात सर्वत्र जल्लोष :*
मतमोजणीनंतर नमिता मुंदडा या विजयी झाल्याचे समजताच संपूर्ण मतदारसंघात नागरिक, महिला-भगिनी आणि युवक वर्गाने जागोजागी गुलाल उधळीत, फटाके फोडून, पेढे वाटून आपला आनंदोत्सव साजरा केला.
