अक्षय भैय्या मुंदडा यांनी घेतली रमेशराव आडसकर यांची भेट
केज! प्रतिनिधी
केज विधानसभा मतदारसंघाच्या अतितटीच्या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवार नमिताताई मुंदडा यांनी 2687 मतांनी महाविकास आघाडीचे पृथ्वीराज साठे यांचा पराभव करून विजयी मिळवला आहे
यातच माजलगाव मतदारसंघांचे अपक्ष उमेदवार रमेशराव आडसकर यांचा निसटता पराभव झालेला असताना केज मतदार संघाचे युवा नेते अक्षय भैय्या मुंदडा यांनी रमेशराव आडसकर यांच्या निवासस्थानी भेट घेतली व आडसकर कुटुंबीयांनी अक्षय भैय्या मुंदडा यांचा सत्कार करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी रमेशराव आडसकर साहेब, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती अंकुश आण्णा इंगळे,रुषीकेश आडसकर, रंजित आडसकर,व कार्यकर्ते उपस्थित होते
रमेशराव आडसकर साहेब यांची अक्षय भैय्या मुंदडा यांनी भेट घेतल्याने केज मतदार संघात ही भेट येणार्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तडजोडीची तर नसावी आशी देखील चर्चा नागरिक जोरात करत आहेत
