अंबाजोगाई तालुक्यात मनसे उमेदवाराला जोरदार प्रतिसाद
केज!!प्रतिनिधी
केज मतदार संघातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार रमेश तात्या गालफाडे यांनी अंबाजोगाई परिसर पिंजून काढला पुरुषांची विनम्रपणे अभिवादन मतारूपी आशीर्वाद द्यावेत मला संधी म्हणजे विकासाला संधी मला संधी म्हणजे आदरणीय राज ठाकरे यांना संधी असे आव्हान करीत अंबाजोगाई तालुका पिंजून काढला आहे ढोल ताशाच्या गजरात प्रचार सुरू. यावेळी झालेल्या कॉर्नर बैठकीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.रमेश तात्या गालफाडे यांच्यासोबत मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष सुनील जगताप लक्ष्मण वाघमारे तसेच असंख्य महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते झालेल्या कॉर्नर बैठकीत उपस्थित होते.रायगड नगर येथील कार्नर बैठकीत बोलतांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार रमेश तात्या गालफडेयांनी उपस्थित महिलांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या त्यातील प्रमुख मागण्यांसाठी जसे की घरकुल व रायगड नगर सह शहरातील अनेक भोगवटादार यांना मालकी हक्काचे पीटीआर देण्यासंबंधी काम करण्याचे वचन तात्यांनी दिले.
