मित्र वनव्या मध्ये गारव्या सारखा हारुणभाई इनामदार व सिताताई बनसोड पृथ्वीराज साठे यांना विजयी करण्यासाठी पायला भिंगरी बांधून फिरत आहेत

केज! प्रतिनिधी

हारुणभाई इनामदार यांच्या मार्गदर्शनाखाली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(ए) यांचा पृथ्वीराज साठे यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाचे तथा महाविकास आघाडीचे उमेदवार पृथ्वीराज साठे यांच्या विजयासाठी हारुणभाई इनामदार यांनी विडा उचलला असून जनविकास परिवर्तन आघाडीचे ज्येष्ठ नेते, नगराध्यक्षा, नगरसेवक व कार्यकर्ते पृथ्वीराज साठे यांना विजयी करण्यासाठी महाविकास आघाडीच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत.
हारुणभाई इनामदार यांच्या मार्गदर्शनाखाली व संदिपान तात्या हजारे व सुनील हिरवे यांच्या नेतृत्वाखाली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए केज तालुका यांच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
या मेळाव्यामध्ये एक मताने ठराव घेऊन महाविकास आघाडीचे उमेदवार पृथ्वीराज साठे यांना हारुणभाई इनामदार यांच्या नेतृत्वाखाली जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना हारुणभाई म्हणाले की, आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजासह मुस्लिम,दलित,ओबीसी समाज बांधवांसाठी लढत आहेत.
मनोज जरांगे पाटील यांच्याकडे उमेदवारीची मागणी करणाऱ्या सर्वांनी स्वतःचे अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेऊन केज मतदार संघाचा विकास व्हावा या हेतूने पृथ्वीराज साठे यांना पाठिंबा दिला आहे. बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग बप्पा सोनवणे यांनी सर्व इच्छुक अपक्ष उमेदवारांना एकत्रित करून पृथ्वीराज साठे यांना निवडून आणण्यासाठी अहोरात्र काम करत आहेत. बजरंग बप्पा सोनवणे यांच्या विनंतीला मान देऊन आम्ही आमच्या जनविकास परिवर्तन आघाडीचा पाठिंबा दिला आहे.
पुढे बोलताना इनामदार म्हणाले की,पृथ्वीराज साठे हे एका गरीब कुटुंबातून आल्यामुळे त्यांना गरीब जनतेच्या प्रश्नांची जाण आहे अशा जाण असणाऱ्या पृथ्वीराज साठे यांनाच येणाऱ्या २० तारखेला भरभरून मतदान करून त्यांना निवडून द्यायचे आहे असे उपस्थित नागरिकांना त्यांनी आवाहन केले आहे. आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी सकल मराठा समाजासह दलित,मुस्लिम ओबीसी यांच्यासाठी एक मोठा लढा उभा करून स्वतःच्या जीवाची परवा न करता अनेक वेळा उपोषण केले परंतु विद्यमान आमदार यांनी या लढ्याला पाठिंबा दिला नाही.
यावेळी नगराध्यक्षा सौ. सीताताई बनसोड बोलताना म्हणाले की, केज मतदार संघामध्ये अनेक महिलावर गुन्हे घडले मोठ्या मोठ्या घटना घडल्या परंतु विद्यमान आमदार या महिला असून देखील त्यांनी त्या घटना घडलेल्या कुटुंबाला कधी भेट दिली नाही अथवा त्यांच्या प्रश्नावर आवाज उठविला नाही त्यामुळे आपल्या महिलांच्या मुलांच्या व शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठवण्यासाठी पृथ्वीराज साठे यांना भरघोस मताने निवडून द्यायचे आहे कुणाच्या भुल थापाला व अमिषाला बळी न पडता एक निष्ठेने एकाग्रतेने सर्वांनी मिळून साठे साहेबांना निवडून आणण्यासाठी काम करायचे आहे.
यावेळी संदिपान तात्या हजारे म्हणाले की,आमचा पक्ष हा महायुतीतील घटक पक्ष आहे परंतु विद्यमान आमदार व त्यांच्या कुटुंबाला दलितांची एलर्जी आहे. त्यांना दलित समाजाची मते जमतात परंतु दलितांचा विकास करायला जमत नाही आणि दलित समाजाला भेटायला त्यांना वेळ देखील भेटत नाही असे बोलताना संदिपान तात्या यांनी स्पष्ट केले आहे.
हारुणभाई इनामदार यांनी केज मतदार संघातील सर्व दलित चळवळीतील पक्ष व संघटना एकत्रित कले त्या सोबतच मराठा मुस्लिम,साळी,माळी, कोळी या समाजासह आठरा पगड जातीच्या समाज बांधवांना एकत्रित करून पृथ्वीराज साठे यांना विजयी करण्यासाठी त्यांनी विडा उचलला आहे.
हारुणभाई इनामदार हे गेल्या वीस ते पंचवीस वर्षापासून समाजकारण व राजकारणामध्ये सक्रिय आहेत इनामदार हे ज्या पक्षाकडे असतात त्याच पक्षाच्या उमेदवाराला गुलाल लागलेला आहे आज पर्यंतचे रेकॉर्ड असल्याचे नागरिकांतून बोलले जात आहे.
यावेळेस रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया केज तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते आणि जन विकास परिवर्तन आघाडीचे नगरसेवक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संपादक दशरथ चवरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *