कृतिशील कार्यकर्ते डॉ हनुमंत सौदागर यांच्या पुढाकारातून सारणी गाव हागणदारीमुक्त
केज !प्रतिनिधी
तालुक्यातील सारणी गावी मुख्य रस्त्यावर गावातील महिला पुरुष उघड्यावर शौचालयासाठी येत होते. गावास हागणदारी मुक्त करण्यासाठी कृतिशील कार्यकर्ते डॉ हनुमंत सौदागर यांनी पुढाकार घेतला. गावकऱ्यांच्या सहकार्यातून हागणदारी मुक्त केले.
शाळेतून जनजागृती फेरी काढून नागरिकांना प्रबोधन केले. प्रत्यक्ष हागणदारीच्या ठिकाणी सकाळी जाऊन रांगोळी काढणे, उघड्यावर येणाऱ्यांना फुले देऊन नागरिकांचे स्वागत करणे. प्रत्यक्ष हाती खराटा घेऊन हागणदारीतील घाण साफ करणे नागरिकांना समजावून सांगणे असे वेगवेगळे प्रयोग करून प्रत्यक्ष रस्त्यावर उभे राहून नागरिकांना नम्रपणे वंदन केले या सर्व प्रयत्नानंतर शौचालयाला उघड्यावर जाणाऱ्या महिला आणि पुरुषांनी आता शौचालयाचा वापर सुरू केला आहे. गाव हागणदारीमुक्त झाले आहे. हा हागणदारी मुक्तीचा लढा ते अविरतपणे सुरू ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले. लोकचळवळ यशस्वी करण्यासाठी गावातील सर्वांनी सहकार्य केले. आम्ही उघड्यावर जाणार नाही असा फलक गावात लावण्यात आला. यापुढे कोणीही उघड्यावर जाणार नाही असे अभिवचन गावकऱ्यांनी दिले.
