महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची जाहीर सभा संपन्न

केज! प्रतिनिधी

केज विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार रमेश तात्या गालफाडे यांच्या प्रचारार्थ मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांची उपस्थिती प्रमुख होती परंतु काही कारणास्तव ते या प्रचार सभेला संबोधित करू शकले नाहीत पण फोन द्वारे त्यांनी सभेला संबोधित केले आणि मनसे चे उमेदवार रमेश तात्या गालफाडे यांना विजयी करण्यासाठी आवाहन केले आज केज येथे सभा संपन्न झाली या वेळी रमेश तात्या गालफाडे यांच्या पाठिशी मतदारांनी उभा रहावे असे आव्हान केले.
केज विधानसभा मतदारसंघाचे आजी माजी आमदार मतदार संघाचा विकास करण्यात अपयशी ठरले आहेत केज मतदार संघाचा विकास करण्यासाठी,तरुणांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी,महिलांच्या सक्षमीकरणासाठी,पाण्याचा प्रश्न,विजेचा प्रश्न यासह शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न सोडवण्यासाठी केज विधानसभा मतदारसंघातील नागरिकांनी मतदान रुपी आशीर्वाद द्यावेत अशी विनंती रमेश तात्या गालफाडे यांनी या सभे वेळी उपस्थित नागरिकांना केली आहे

संपादक दशरथ चवरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *