केज विधानसभा निवडणुकीनिमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए चा कार्यकर्ता मेळावा हारुणभाई इतर इनामदार यांच्या मार्गदर्शनाखाली व संदिपान हजारे, सुनील हिरवे यांच्या नेतृत्त्वाखाली शुक्रवार रोजी दुपारी तीन वाजता भव्य कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला आहे या मेळाव्याला हजारोंच्या संख्येने उपस्थित रहाण्याचे आवाहन संदिपान हजारे, सुनिल हिरवे यांनी केले आहे या वेळी कार्यकर्त्यांना मोलाचे मार्गदर्शन करण्यात येणार आहे कांही दिवसावर विधानसभा निवडणुका आल्या आहेत त्या अनुषंगाने हा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला आहे या वेळी हारुणभाई इनामदार यांचे मोलाचे मार्गदर्शन होणार आहे हारुणभाई यांनी पृथ्वीराज साठे यांचे हात बळकट करण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन केले आहे