नमिताताई मुंदडा यांच्या प्रचारार्थ बरड येथे जाहीर सभा
केज! प्रतिनिधी
केज विधानसभा मतदारसंघाच्या भाजपाच्या उमेदवार नमिता ताई अक्षय मुंदडा यांच्या प्रचारार्थ केज तालुक्यातील बरड फाटा येथे भाजपाच्या राष्ट्रीय सचिव लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांची भारतीय जनता पार्टी व महायुतीच्या उमेदवार नमिता ताई अक्षय मुंदडा यांच्या प्रचारार्थ बरड येथे जाहीर सभेचे उद्या 16 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 4-30 वाजता भव्य सभेचे आयोजन केले आहे, या सभेने केज मतदार संघात परीवर्तन नक्की घडणार असल्याचे बोलले जात आहे पंकजाताई मुंडे या सभेला संबोधित करणार आहेत त्या काय बोलणार या कडे केज मतदार संघाचे लक्ष लागले आहे नमिता ताई मुंदडा यांना विजयी करण्यासाठी महायुती चे सर्व कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत उद्याच्या सभेला हजारोंच्या संख्येने उपस्थित राहा असे आवाहन भारतीय जनता पार्टी व महायुतीच्या वतीने करण्यात आले आहे
