रमेश तात्या गालफाडे यांच्या प्रचारार्थ राज ठाकरे यांची जाहीर सभा
केज : प्रतिनिधी
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे दि.14 नोव्हेंबर 2024 रोजी केज मध्ये ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे केज विधानसभा मतदारसंघासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून रमेश गालफाडे यांना उमेदारी मिळाल्यानंतर त्यांच्या प्रचारार्थ राज ठाकरे यांची जाहीर सभा मोंढा मैदान केज होणार असून या सभेत राज ठाकरे काय बोलणार याकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे.या सभेला केज मतदार संघातील मतदार बांधवांनी जास्तीत जास्त उपस्थित राहावे असे आवाहन मनसेचे उमेदवार रमेश तात्या गालफाडे यांच्या वतीने करण्यात आले आहे
