केज ! प्रतिनिधी
मराठा सेवा संघाच्या वतीने ज्योतिराव फुले आदर्श शिक्षक गौरव पुरस्कार वितरण कार्यक्रम केज येथे
दि ७ डिसेंबर रोजी सकाळी 10.30 वाजता गट शिक्षणाधिकारी कार्यालय, केज येथे होणार आहे.
शिक्षकांच्या योगदानाचे मूल्य अधोरेखित करण्यासाठी, तसेच त्यांच्या कार्याचा समाजमान्य गौरव व्हावा या उदात्त हेतूने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.या कार्यक्रमाचे अध्यक्ष गटशिक्षणाधिकारी सुनिल केंद्रे असणार आहेत.शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती या सोहळ्याला विशेष महत्त्व देणार आहे. शिक्षणक्षेत्रात नवनवीन प्रयोग करणारे, विद्यार्थ्यांमध्ये मूल्यशिक्षण रुजवणारे, समाजाभिमुख कार्य करणारे तसेच शैक्षणिक क्षेत्रात सातत्याने उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या आदर्श शिक्षकांचा सन्मान या कार्यक्रमात करण्यात येणार आहे.
आदर्श शिक्षक गौरव पुरस्कार महादेवी फुलसुरे, मोहन ढाकणे, व्यंकट चव्हाण, संध्याराणी कोल्हे, सुरेखा मोराळे, नवनाथ घुगे, रेखा धेंडे, संगीता नवले, नितीन हावळे ,स्वाती वरपे, बाबुराव तांबडे ,बालासाहेब लोखंडे, आश्रुबा गायकवाड, पुंडलिक पोपळघाट, शामल जाधव या शिक्षकांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे
कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती डॉ.अशोक थोरात संचालक, आरोग्य विमा महामंडळ, महाराष्ट्र राज्य
तहसीलदार राकेश गिड्डे : तहसीलदार, केज
शैलेश फडसे मुख्य कार्यकारी अधिकारी, बीड नगरपरिषद, जी.बी गदळे : सचिव, जीवन विकास शिक्षण मंडळ, केज, नागनाथ जाधव जिल्हाध्यक्ष म.से.सं. बीड
शिवश्री. डॉ. भाऊसाहेब चाळक जिल्हा उपाध्यक्ष म.से.सं. बीड, दत्तात्रय चाटे शिक्षण विस्तार अधिकारी, हनुमंत भोसले सामाजिक कार्यकर्ते, केज,हनुमंत घाडगे ज्येष्ठ साहित्यिक, केज, डॉ.हनुमंत सौदागर
जनार्धन सोनवणे ज्येष्ठ साहित्यिक, केज, शिवाजी ठोंबरे जिल्हाध्यक्ष छावा संघटना, बीड
भाई मोहन गुंड नेते, शेकाप, केज
विनोद शिंदे जिल्हाध्यक्ष, म.से.सं,समन्वयक, बीड गोविंद शिनगारे , केज
राहुल खोडसे जिल्हाध्यक्ष, संभाजी ब्रिगेड, बीड यांसह विविध मान्यवरांची, शिक्षक आणि अधिकारी यांची उपस्थिती लाभणार आहे.
शिक्षक हा समाजाचा दिशा-दर्शक दीपस्तंभ आहे. विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व घडविणे, विचारसंपन्न समाजनिर्मिती करणे आणि राष्ट्राच्या विकासात योगदान देणारे नागरिक तयार करणे ही जबाबदारी शिक्षक पार पाडत असतात. समाजातील या कर्तव्यदक्ष शिक्षकांना सन्मानित करून प्रेरणेचा संदेश देणे, ही काळाची गरज असल्याचे मत कार्यक्रम आयोजकांनी व्यक्त केले.
मराठा सेवा संघ, शाखा केज यांनी गेल्या काही वर्षांत विविध सामाजिक, शैक्षणिक आणि जनजागृतीपर उपक्रमांद्वारे समाजाभिमुख कार्य सिद्ध केले आहे. त्याच परंपरेत आदर्श शिक्षक गौरव सोहळा हा आणखी एक महत्त्वाचा टप्पा असल्याचे संघाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. आदर्श शिक्षकांचा गौरव झाल्याने नव्या पिढीत शिक्षणाबद्दल आदर, कर्तृत्व आणि प्रेरणा वाढीस लागेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.
पुरस्कार वितरण सोहळा कार्यक्रमास शिक्षक, पालक, विद्यार्थी, माजी विद्यार्थी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मराठा सेवा संघ शाखा केज सर्व पदाधिकारी यांनी केले आहे
