केज! प्रतिनिधी

केज तालुक्यातील लाडेगाव या गावचे रहिवाशी असलेले कल्याण अंबाड यांच्या शेतामध्ये साक्षात श्री गणेशजी (पपई) फळाच्या रुपात अवतरले.

केज तालुक्यातील लाडेगाव या गावी कल्याण अंबाड यांची शेती असून त्यांना फळझाडे लावण्या चा छंद तसा जुनाच आहे दरवर्षी वेगवेगळे प्रयोग करून वेगवेवेगळी पिके घेवून ते नेहमीच चर्चेत असतात सध्या केशर आंबा, चिकू, पपई, वेगवेगळी आंब्याची झाडे, तसेच फुलझाडे असे अनेक प्रयोग करून शेती करण्याचा त्यांचा छंद वाखाणण्याजोगा, कौतुकास्पद आहे, या वर्षी श्री कल्याण अंबाड यांनी शेतात पपई लावली असून ती चांगली जोपासली आहे आता पपईच्या झाडाला चांगलीच पपई ची फळे लागली आहेत परंतु आश्चर्याची बाब म्हणजे दोन्ही पपईच्या दोन्ही झाडाला फळाच्या रुपात प्रत्यक्ष श्री गणेशजी ची मुर्ती साकारली असून जणू काही गणेशजी नी दर्शन दिले असे वाटते. असा हा निसर्गाचा चमत्कार असून श्री कल्याण अंबाड यांच्या शेतात भक्तांची पाहण्यासाठी गर्दी जमली होती, प्रत्यक्ष श्री गणेश जी नी पपईच्या रुपात दर्शन दिल्याने अंबाड कुटुंब आनंदाने आणि समाधानाने भारावून गेले असल्याचे दिसून येत आहे.

संपादक दशरथ चवरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *