केज प्रतिनिधी

यावेळी अरणगाव चे सरपंच मा.सचिन भैय्या सिरसट तसेच सेवा सोसायटीचे चेअरमन मा.आश्रुबा भांगे हे उपस्थित होते यावेळी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते संत भगवान बाबा व गोपीनाथ मुंडे साहेब यांच्या प्रतिमांचे पूजन करून अभिवादन करण्यात आले, त्यानंतर सरपंच सचिन सिरसाट व अश्रुबा भांगे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले संत भगवान बाबा व मुंडे साहेब यांचे सामाजिक समतेचे विचार समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे ,या महामानवांच्या विचारानेच समाजाची प्रगती होईल असे ही मान्यवरांनी प्रतिपादन केले. मुंडे साहेब यांच्या सामाजिक, राजकीय प्रवास या विषयी ही उपस्थित मान्यवरांनी माहिती दिली. सर्व समाजातील तरुणांनी संत भगवान बाबा व मुंडे साहेब यांच्या समाज परिवर्तन विचारांचा प्रसार व प्रचार करणे त्या नुसार चालणे आवश्यक आहे असे अविनाश गायकवाड यांनी प्रतिपादन केले या कार्यक्रमासाठी उपस्थित संस्थेचे उपाध्यक्ष मा. अविनाश गायकवाड, मा प्रविण लोंढे, मा. श्रावण सोनवणे, सुंदर गायकवाड अंगणवाडी सेविका अलका गायकवाड व इतर होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रविण लोंढे यांनी केले तर आभार श्रावण सोनवणे यांनी मानले.हा कार्यक्रम अतिशय आनंदी व उत्साही वातावरणात संपन्न झाला.

संपादक दशरथ चवरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *