केज ! प्रतिनिधी
शेतकऱ्यांच्या ऊसाला चांगला दर मिळावा, यासाठी बीड जिल्ह्यात ऊसउत्पादक शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. अशातच खा.बजरंग सोनवणे यांनी बीड जिल्ह्यातील साखर कारखान्यापैकी सर्वाधिक दर ऊसउत्पादकांना देण्याची तयारी केली आहे. केवळ तयारीच नाही तर पहिला हप्ता २८०० रूपयांप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्गही करण्यात आला आहे. दरम्यान, अंतिम दर हा तीन हजार रूपयांपेक्षाही अधीक देण्याचा प्रयत्न असल्याचे आश्वासन खा.सोनवणे यांनी दिले आहे.
२०२५-२६ गळीत हंगामात ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक बळ देण्यासाठी येडेश्वरी साखर कारखान्याने महत्वाचा निर्णय घेतला आहे. गाळप झालेल्या उसाचे शेतकऱ्यांच्या खात्यात प्रथम हप्ता २८०० प्रति टन जमा करण्यात आले आहेत. ऊसाच्या प्रमाणानुसार रक्कम थेट बँक खात्यांमध्ये जमा केली जात आहे. ऊस उत्पादक शेतकरी शेतीचे चालू खर्च आदी गरजांसाठी हा तातडीचा निधी मोठा दिलासा ठरणार आहे. निर्णयाचे स्थानिक पातळीवर स्वागत होत असून, शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. याच पार्श्वभूमीवर कारखान्याचे चेअरमन आणि खा.बजरंग सोनवणे यांनी अंतिम दराबाबत महत्त्वाचे विधान केले. ‘येडेश्वरी साखर कारखाना शेतकऱ्यांच्या हक्काचा दर देण्यास बांधील आहे. यंदाच्या हंगामात कारखाना एफआरपीपेक्षा जास्त म्हणजेच तीन हजार रूपयांपेक्षाही अधिक प्रति टन ऊस दर देणार आहे,’ असे ते म्हणाले. शेतकरी हिताला प्राधान्य देत घेतलेल्या या भूमिकेमुळे ऊस उत्पादकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. शेतकऱ्यांनकडून कारखान्याच्या निर्णयाचे स्वागत करत, ‘कारखाना शेतकऱ्यांच्या बाजूने ठाम उभा आहे; जास्त दराची हमी ही मोठी दिलासादायक बाब आहे,’ अशी प्रतिक्रिया खा.बजरंग सोनवणे यांनी दिली. दरम्यान, सन २०२४-२५ मध्ये उसाला १० रिकव्हरी लागलेली होती. त्यानूसार २४०० रूपयाप्रमाणे एफआरपी प्रमाणे दर मिळतो, परंतु शेतकरी हित लक्षात घेवून खा.सोनवणे यांनी पहिलाच हत्पा २८०० रूपये प्रमाणे दिला आहे. जिल्ह्यात शेतकरी हित जोपासणारा हा पहिलाच कारखाना असल्याच्या शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया दिसत आहेत.
