युसूफवडगांव! प्रतिनिधी

केज तालुक्यातील युसूफवडगांव येथील युवानेते तथा खासदार बजरंग बप्पा सोनवणे यांचे कट्टर समर्थक माजी सरपंच रूपेश बोरगावकर यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस(श.प)च्या केज तालुकाध्यक्ष पदी निवड झाली असुन कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवक आघाडीच्या संघटनात्मक बांधणीस गती देण्यासाठी केज तालुक्यात नवीन पदनियुक्ती करण्यात आली असुन यामध्ये युसूफवडगांव येथील रूपेश बोरगावकर यांची पक्षाच्या विचारधारे प्रतीनिष्ठा ठेऊन त्यांनी सामाजिक व राजकीय क्षेत्रात काम केले आहे.या सोबतच त्यांनी युवकांना राजकारण व समाजकारणत सहभागी करून घेण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत.त्यांच्या याच कार्याची दखल घेऊन पक्षश्रेष्ठींनी त्यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या केज तालुका अध्यक्ष पदी निवड केली असुन या नियुक्तीनंतर रूपेश बोरगावकर यांनी पक्षश्रेष्ठी प्रती कृतज्ञता व्यक्त केली असुन आगामी काळात केज तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद वाढवण्यासाठी व युवकांना राजकीय व सामाजिक क्षेत्रात संधी उपलब्ध करून देण्यासाठी काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.खासदार बजरंग बप्पा सोनवणे यांच्या हस्ते रूपेश बोरगावकर यांना निवडीचे पत्र देण्यात आले त्यांच्या या निवडी बद्दल तालुक्यातील पक्षाचे पदाधिकारी,कार्यकर्ते व युवकांनी आनंद व्यक्त करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

संपादक दशरथ चवरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *