केज! प्रतिनिधी
केज तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांच्या हप्त्यांचे वितरण तात्काळ करावे असे अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याचे संचालन तथा सोनी जवळा ग्रामपंचायत सदस्य मिनाज पठाण यांनी केज पंचायत समितीचे गटविकास अधिकारी नागरगोजे यांना निवेदन दिले आहे.
केज तालुक्यातील गोर गरीब घरकूल लाभार्थी पंतप्रधान आवास योजना, इंदिरा आवास योजना, रमाई घरकुल योजना, शबरी आवास योजना, मोदी आवास योजना या सर्व योजने मधून घरकुलांचे वाटप शासनामार्फत करण्यात येत असून त्याची रक्कम दोन – तीन हप्त्यांमध्ये संबंधीत लाभार्थ्यांना वितरीत करण्यात येते परंतू अर्धवट घरे बांधून लाभार्थी वर्ष – वर्ष वाट पहातात परंतु घरकुलाचा हप्ता वेळेवर खात्यावर जमा होत नाही त्यामुळे गोरगरीब लाभार्थी यांना आर्थिक, मानसीक त्रास सहन करावा लागत असून तालुक्याच्या ठिकाणी चकरा मारून लाभार्थी दिवस दिवस उपाशी राहून ताटकळत बसतात तसेच नाहक परेशान होताना दिसून येतात त्यामुळे त्यांना मानसीक तसेच आर्थिक त्रास सहन करावा लागतो तरी शासनाने सर्व घरकुल योजनांच्या लाभार्थी यांचे घरकुलाचे हाप्ते लवकरात लवकर वितरीत करावे अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल असे मिनाज पठाण यांनी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी नागरगोजे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
