केज । प्रतिनिधी

केज तालुक्यातील बोबडेवाडी येथील ज्ञानेश्वर भाऊसाहेब आदमाने यांची भारतीय सैन्य दलात निवड झाल्याबद्दल माजी पंचायत समिती सदस्य शिवाजी उर्फ बंडु चौधरी व ग्रामस्थांनी केला कुटुंबाचा सत्कार,यशाला अजीबात शॉर्टकट
नसतो… यशाला गवसणी घालण्यासाठी प्रचंड कष्ट असतात.. संघर्ष अटळ असल्याने जो करील त्याला यश नक्की मिळते‌,बोबडे वाडी येथील सामान्य शेतकरी कुटुंबातील‌ भाऊसाहेब आदमाने यांचा मुलगा ज्ञानेश्वर आदमाने यांची भारतीय सैन्य दलात निवड झाली , शेतात राबुन ज्यांच्या हाडाची कार्ड झाली.आशा शेतकरी कुटुंबातील एखादा मुलगा सैन्य दलात भरती होतो, हे यश मिरवण्यासारखे असते ,बोबडे वाडी येथे फटाक्याची आतिषबाजी पाहायला मिळाली.. कारण होते, देशातील प्रत्येक तरुणाचं स्वप्न असलेल्या भारतीय सैन्य दलात भरती होऊन देशसेवा करायची संधी बोबडेवाडी येथील शेतकरी कुटुंबातील तरूणाला मिळाली… हा उत्सव आणि आनंद वेगळाच… त्याचे तुलना कशाशीच नाही… शेतात राबणार्या मायबापाच्या कष्ट अन् परिश्रमाची जाणीव ठेवत ज्ञानेश्वर आदमाने याने प्रचंड मेहनत घेतली. तो नुकताच भारतीय सैन्य दलात भरती झाला. याबद्दल सामाजिक कार्यकर्ते तथा ‌माजी पंचायत समिती सदस्य शिवाजी उर्फ बंडु चौधरी, माजी चेअरमन दामोदर चौधरी पैठण उपसरपंच बाबासाहेब बोबडे,माजी सरपंच निरंजन बोबडे,माजी सरपंच नवनाथ क्षिरसागर,दिपक कोटुळे, मोहनराव बोबडे, गांजी गावचे माजी उपसरपंच सतीश जाधव संजय बोबडे भैय्या जाधव यांनी बोबडे वाडी येथे जाऊन सत्कार केला व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या यावेळी व गावातील जेष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

संपादक दशरथ चवरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *