केज! प्रतिनिधी

आगामी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संदर्भात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने वडगाव जिल्हा परिषद गटामध्ये पक्षातीलच उमेदवार द्यावा जेणेकरून पक्षातील एखाद्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला संधी भेटेल तसेच एखाद्या सुशिक्षित व नवीन नेतृत्वाला संधी भेटेल या दृष्टिकोनातून पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष कथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार साहेब , प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे साहेब, माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे साहेब,जिल्हाध्यक्ष राजेश्वर आबा चव्हाण यांना पत्रकार द्वारे मागणी करणार असल्याचे माहिती केज तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका उपाध्यक्ष प्रितम खरात यांनी दिली आहे. पक्षामध्ये काम करत असताना समाजकारण आणि राजकारण या जोडीला धरून शेतकऱ्यांचे तथा सामाजिक प्रश्न यावर नेहमी काम करणारे चळवळीतील जे नेतृत्व असतात त्यांना संधी पक्षाने देणे गरजेचे आहे जेणेकरून पक्षाचे ताकद वाढेल या दृष्टिकोनातून पक्षाने उमेदवार हा आयात न करता जो प्रामाणिक आणि एकनिष्ठ पक्ष असे राहिलेले आहेत त्यांना संधी देऊन त्यांचा सन्मान करावा जेणेकरून पक्षाचे प्रतिमा सर्वसामान्य लोकांमध्ये स्वच्छ राहील. नाहीतर असे होऊ नये , उमेदवार सक्षम न देता एखाद्या दुसऱ्या पक्षातील उमेदवाराला सहकार्य करू नये अशी विनंती देखील प्रीतम करत करणार आहेत पक्षाकडे हे सांगण्यात आले. आपला पक्ष कसा बळकट होईल याच्या दृष्टिकोनातून उमेदवार देण्यात यावा . मक्या निवडणुकीमध्ये थोड्या फरकाने प्रतिस्पर्धी उमेदवार पराभूत झाला होता या गटामध्ये पक्षाचे ताकद खूप मोठे आहे या पाठांमध्ये रमेश रावजी आडसकर साहेब यांच प्राबल्य आहे शिवाय त्यांची काम करण्याची पद्धत याचा विचार केला असता येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये युसुफ वडगाव जिल्हा परिषद गट राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात येणे सहज शक्य आहे. ज्या प्रकारे कार्यकर्ता हा पक्षामध्ये संघटनात्मक बांधणी करून पक्ष वाढवण्यासाठी काम करत असतो त्याच प्रकारे त्या कार्यकर्त्याला न्याय देणे पक्षाची भूमिका असावी असे मत प्रीतम खरात यांनी मांडले आहे.. लवकरच पक्षाचे अध्यक्ष तसेच उपमुख्यमंत्री अजित दादा पवार साहेब यांना भेटून निवेदनाद्वारे मागणी करणार असल्याचे स्पष्ट केले.

संपादक दशरथ चवरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *