केज ! प्रतिनिधी

तालुक्यातील मानेवाडी प्राथमिक शाळेचे सहशिक्षक ज्ञानोबा पंढरीनाथ रेपे यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा सोमवार रोजी संपन्न झाला. गुरुजींनी दिलेल्या संस्कारामुळेच अनेक विद्यार्थी घडले असे मत रमेशराव आडकर यांनी व्यक्त केले ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मानेवाडी येथील सेवागौरव कार्यक्रमात अध्यक्ष पदावरून बोलत होते.

कार्यक्रमाचे अध्यक्ष अंबा साखर कारखाना चेअरमन ज्येष्ठ नेते रमेशराव आडसकर,
प्रमुख पाहुणे माजी उपसभापती ऋषिकेश आडसकर,रंजित भैय्या आडसकर,गटशिक्षणाधिकारी सुनील केंद्रे, सरपंच शशिकांत इंगळे, उपसरपंच दिगंबर वाघमारे ,जीवन शिक्षण संस्थेचे सचिव ईश्वर मुंडे,डॉ हनुमंत सौदागर,सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक बलभीम रेपे, बाबासाहेब शिनगारे, सय्यद हकीम, सदाशिव थोरात,राजेश देशमुख,एम डी शेख,
महेश सोळंके यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलतांना आडसकर म्हणाले त्यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी
प्रमाणिक सेवा केली पुढील सेवापूर्ती नंतरच्या आयुष्यामध्ये पर्यटन करावे, निरोगी जीवनासाठी शुभेच्छा दिल्या.
ऋषिकेश आडसकर म्हणाले
चांगला विद्यार्थी घडवले —
चांगली सेवा दिली म्हणून त्यांची मुले डॉक्टर इंजिनिअर घडली असे मत व्यक्त केले.
ईश्वर मुंडे म्हणाले शिक्षक हा समाजाचा आधारस्तंभ आहे. त्यांनी घडवलेले अनेक विद्यार्थी देशासाठी योगदान देतील असे मत व्यक्त केले.
डॉ सौदागर म्हणाले शिक्षकांच्या जीवनात सेवापुर्तीनंतर विद्यार्थ्यांच्या आठवणी विसरता येत नाहीत.यापुढे सामाजिक कार्यात झोकून देऊन सेवा करावी असे मत व्यक्त केले.
गटशिक्षणाधिकारी सुनील केंद्रे म्हणाले रेपे यांनी आदर्श शिक्षकासारखे काम केले असे मत व्यक्त केले.
यावेळी केंद्राच्या वतीने ज्ञानोबा रेपे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमात माजी विद्यार्थ्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी केंद्रीय मुख्याध्यापक सुनील वैरागे, मुख्याध्यापक युवराज हिरवे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष लक्ष्मण माने, पवन माने आदींनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमास विद्यार्थी पालक शिक्षण प्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संपादक दशरथ चवरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *