अंबाजोगाई! प्रतिनिधी
शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्ष अंबाजोगाईच्या वतीने नगर परिषद निवडणूक लढविणाऱ्या इच्छुक उमेदवार शिवसैनिकांनी तात्काळ उमेदवारी अर्ज घेऊन जाण्याचे आवाहन अंबाजोगाई तालुका प्रमुख श्रीधर गरड यांनी केले आहे.
निवडणूक आयोगाने नगरपरिषद निवडणुका जाहीर केल्या असून २ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. त्या अनुषंगाने शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्ष अंबाजोगाई यांच्या वतीने अंबाजोगाई नगर परिषदेची निवडणूक ताकदीने लढविण्यात येणार आहे. ज्या इच्छुक उमेदवारांना नगर परिषदेची निवडणूक लढवायची आहे, त्या संदर्भात सोमवार .१० नोव्हेंबर रोजी मारोतीराव भिसे, कॉम्प्लेक्स मेन रोड, हनुमाननगर अंबाजोगाई येथे दुपारी दोन वाजता खास बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीला शिवसेना महिला आघाडीच्या नैनाताई शिरसाठ, उपजिल्हाप्रमुख शिवाजी कुलकर्णी यांची उपस्थिती राहणार आहे. तरी सर्व पदाधिकारी, अंगीकृत शिवसेना संघटना पदाधिकारी, महिला आघाडी पदाधिकारी शिवसैनिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन शिवसेना शहरप्रमुख अशोक हेडे व तालुकाप्रमुख श्रीधर गरड, महिला तालुका प्रमुख रेखाताई घोबाळे यांनी केले आहे
