केज/प्रतिनिधी
केज तालुक्यातील टाकळी येथील प्रलंबित लाईटचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे उपअभियंता उपविभाग केज यांच्याकडे सरपंच सौ. एस.ए. घुले यांनी केली आहे जर आठ दिवसांमध्ये वीज पुरवठा सुरळीत न चालू केल्यास १८ नोव्हेंबर पासून केज तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा प्रशासनाला इशारा देण्यात आला आहे, केज तालुक्यातील टाकळी येथील मागील तीन वर्षापासून विजेच्या समस्या कायम आहेत. त्यासंबंधी वारंवार आपल्या व वरिष्ठ कार्यालयाकडे पत्रव्यवहार करण्यात आलेले आहेत त्या संदर्भाने दिनांक २९ ऑगस्ट २०२३ रोजी केज तहसील कार्यालय येथे आमरण उपोषण करण्यात आले होते. त्यावेळी तत्कालीन उपकार्यकारी अभियंता, केज यांनी लेखी पत्र देऊनही अद्याप पर्यंत कामे पूर्ण झालेली नाहीत. त्या संदर्भाने वारंवार पत्रव्यवहार करण्यात आलेले आहेत आमच्या पुढील मागण्या आठ दिवसात पूर्ण न झाल्यास तहसील कार्यालय, केज .येथे दिनांक १८ नोव्हेंबर २०२५ पासून आमरण उपोषण करण्यात येईल. टाकळी गावातील व वस्तीवरील सिंगल फेज व थ्री फेज रोहित्र दुरुस्त करणे, टाकळी गावठाण
फिटरचे अपूर्ण काम पूर्ण करून वीजपुरवठा कार्यान्वित करण्यात यावा, गावासाठी पूर्ण वेळ लाईनमन देण्यात यावा, चिंचोली माळी सबस्टेशन
वरून होणारा विद्युत पुरवठा पूर्ण क्षमतेने सुरळीत पणे अविरत चालू ठेवावा असे लेखी निवेदनात म्हटले आहे. या लेखी निवेदनावर सरपंच सौ. एस.ए. घुले यांची स्वाक्षरी आहे. या लेखी निवेदनाच्या प्रति उपअभियंता उपविभाग केज, राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री बीड, खासदार बीड, जिल्हाधिकारी बीड, अधिक्षक अभियंता महावितरण बीड, कार्यकारी अभियंता आंबेजोगाई, तहसीलदार केज यांना दिल्या आहेत.
