.
केज! प्रतिनिधी
. केज तालुक्यातील सारणी आनंदगाव येथील रहिवाशी असलेले तथा गेल्या पस्तीस वर्षांपासून दलित चळवळीतुन कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना नावलौकिक करणारे, अन्याय अत्याचार च्या विरोधात आवाज उठवणारे,सामाजिक बांधिलकी जपणारे, सोडविण्याच्या दृष्टिकोनातून जनतेच्या कामासाठी तत्पर असणारे ज्येष्ठ नेतृत्व चंद्रकांत खरात सर यांचे चिरंजीव तथा वडिलांच्या पावलावर पाऊल टाकून तेच काम पुढे घेऊन जाणारे, सर्व जाती धर्मातील लोकांच्या कामाला येणाऱ्या नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे केज तालुका उपाध्यक्ष मा. प्रितम खरात यांना युसुफ वडगाव पंचायत समिती गण मागासवर्गीय साठी राखीव असल्याने ठिकाणी निवडणुकीच्या काळात उडी मारणारे उमेदवार भरपूर आहेत पण नेहमी रस्त्यावर काम करणारे नेतृत्व म्हणून जे लोकांच्या कामासाठी अग्रेसर असतात अशा व्यक्तींना सामाजिक विकास करण्याची संधी द्यावी यासाठी युसुफ वडगाव पंचायत समिती गणातील जनतेतून प्रितम खरात यांना महायुती कडून राष्ट्रवादी काँगेस पक्षांकडे मागणी होत आहे . प्रितम खरात हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ असून ते मा.आ.धनंजय मुंडे यांचे ते विश्वासू समजले जातात त्यामुळे त्यांना उमेदवारी दिल्यास महायुती ला जिल्हा परिषद उमेदवार साठी देखील गटा मध्ये भरपूर फायदा होऊ शकतो हा विचार करून प्रितम खरात यांना उमेदवारी देऊन न्याय द्यावा.अशी मागणी गणातून होत आहे..
