जागतिक महिला दिनानिमित्त तालुकास्तरीय महिला व मुलींची कबड्डी स्पर्धा संपन्न
केज! प्रतिनिधी
जागतिक महिला दिनानिमित्त कोरो एकल महिला संघटनेच्या वतीने तालुकास्तरीय महिला व मुलींच्या खुल्या कबड्डी स्पर्धा केज शहरातील जिल्हा परिषद शाळा केज येथे घेण्यात आल्या.या स्पर्धेत स्वामी विवेकानंद माध्यमिक विद्यालय सोनिजवळा येथील मुलींनी बाजी मारत प्रथम क्रमांकाचे ५ हजार रुपये चे रोख पारितोषीक पटकावले ,या स्पर्धेत विविध संघ सहभागी झाले होते.केज मध्ये महिला व मुलींच्या खुल्या कबड्डी स्पर्धेचे आयोजन कोरो एकल महिला संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आल्या होत्या.या कार्यक्रमाच्या उद्घाटक विनयाताई होत्या तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वत्सलाताई शिनगारे व कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या केज नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सौ सिताताई बनसोड . स्वामी विवेकानंद माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावला विजयी संघाला पारीतोषीक वितरित करण्यात आले यामध्ये रोख रक्कम, ट्रॉफी, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले या स्पर्धेत महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. यावेळी कोरो एकल महिला संघटनेच्या कार्यकर्त्या शाळेचे शिक्षक राऊत सर, प्रमुख पाहुणे उपस्थित होते
