खा.रजनीताई पाटील यांच्यावर पुन्हा मोठी जबाबदारी

(हिमाचल आणि चंदिगड दोन राज्याची जबाबदारी)

केज ! प्रतिनिधी

काँग्रेस पक्षात निष्ठेला महत्व आहे याची प्रचिती पुन्हा कॉंग्रेसच्या नेत्या खा. रजनीताई पाटील यांच्या रुपाने बीड जिल्ह्याला आली असून परवा भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या जनरल सेक्रेटरी व राज्याचे इंचार्ज यांची पक्षाने नावे जाहीर केली यामध्ये खा. रजनीताई पाटील यांच्यावर पुन्हा पक्षाने मोठी जबाबदारी दिली असून त्यांना हिमाचल प्रदेश व चंदिगड या दोन्ही राज्याचे प्रभारी केल्याने आता खा. रजनीताई पाटील यांना राहुल गांधी व पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या टीम मध्ये काम करण्याची संधी उपलब्ध झाली असून त्यांच्या या निवडीबद्दल जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला आहे तर गांधी घराण्यावर असलेली निष्ठा परत कामाला आल्याची भावना याप्रसंगी व्यक्त होत आहे.

काँग्रेसच्या नेत्या खा. रजनीताई पाटील यांनी सोनिया गांधी व गांधी परिवारावर ठेवलेली निष्ठा याचेच हे फळ आहे. परवा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या जनरल सेक्रेटरी व राज्याचे प्रभारी यांची नावे पक्षाने जाहीर केले. यामध्ये हिमाचल प्रदेश व चंदिगड या दोन राज्याच्या प्रभारी म्हणून काँग्रेसच्या जेष्ठ नेत्या तथा राज्यसभेच्या खासदार रजनीताई पाटील यांना जबाबदारी देण्यात आली आहे सोनिया गांधी यांच्या टीम मध्ये यापूर्वी देखील रजनीताई यांनी काम पाहिले आहे व आता पुन्हा राहुल गांधी आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या टीम मध्ये देखील काम करण्याची संधी रजनीताई यांना उपलब्ध झाली असून त्यांच्या या निवडिबद्दल जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.

संपादक दशरथ चवरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *