ग्रामपंचायत कार्यालय सोनिजवळा यांच्या वतीने हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन

केज/प्रतिनिधी

केज तालुक्यातील सोनिजवळा येथील सरपंच सौ जान्हवी ताई ससाणे व ग्रामपंचायत कार्यालय सोनिजवळा यांच्या वतीने मकरसंक्रांती निमित्त हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते

या बाबत सविस्तर वृत्त असे की केज तालुक्यातील सोनिजवळा येथे ग्रामपंचायत कार्यालय व सौ जान्हवी ताई ससाणे यांच्या वतीने जिल्हा परिषद शाळा सोनिजवळा येथे हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात सहभागी महिलांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन ठेवण्यात आले होते या मध्ये उखाणे ,संगीत खुर्ची,बाॅटल मध्ये पाणी भरणे, तळ्यात मळ्यात, आसे विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते या मध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय, प्रोत्साहनपर बक्षिसे देण्यात आले या कार्यक्रमासाठी गावातील महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या , हळदीकुंकू महोत्सवाच्या माध्यमातून महिला एकत्र येत विचाराची देवाणघेवाण करुन एकमेकींशी हितगुज साधत असल्यामुळे या कार्यक्रमावर महिला खुश असल्याच्या प्रतिक्रिया देत आहेत, महिला घर काम, व्यवसाय, नौकरी,सह इतर कामात वर्षभर व्यस्त असतात त्यामुळे महिलांना एकमेकांना संवाद साधता येत नाही, या हळदीकुंकू कार्यक्रमाच्या माध्यमातून संधी उपलब्ध केल्याने महिला वर्गात आनंदाचे वातावरण पसरले होते , हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जि.प.सोनिजवळा शाळेचा सर्व स्टाफ‌ व शालेय शिक्षण समिती चे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य, यांनी मोलाचे सहकार्य केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ हनुमंत सौदागर सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन गोविंद ससाणे यांनी मानले

संपादक दशरथ चवरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *