स्वामी विवेकानंद विद्यामंदिर माध्यमिक विभाग या शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न
स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळतो- लक्ष्मणरावजी बेडसकर
केज ! प्रतिनिधी
जीवन विकास शिक्षण मंडळ केज, संचलित स्वामी विवेकानंद विद्यामंदिर [ माध्यमिक विभाग ] केज या शाळेमध्ये शैक्षणिक वर्ष २०२४-२५ या वर्षांमधील स्नेहसंमेलन कार्यक्रम अत्यंत हर्षोत्साहत पार पडला. या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून मा. श्री. लक्ष्मणरावजी बेडसकर गटशिक्षणाधिकारी, गट साधन केंद्र पंचायत समिती केज तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मा. अंकुशरावजी इंगळे अध्यक्ष, जीवन विकास शिक्षण मंडळ केज हे उपस्थित होते. तर प्रमुख उपस्थितीमध्ये संस्थेचे संचालक नारायण अण्णा अंधारे, शैलाताई इंगळे अध्यक्षा, शालेय व्यवस्थापन समिती मा. वि. केज, शाळेच्या मुख्याध्यापिका शिवनंदा मुळे, गणेश कोकीळ प्राचार्य, स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल केज, सेवानिवृत्त शिक्षक हनुमंत घाडगे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख उद्घाटक लक्ष्मणरावजी बेडसकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. याप्रसंगी सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रबोधकांत समुद्रे व शाळेतील विद्यार्थिनी यांच्या ‘ स्वागताशी पाहुण्यांच्या, झाली फुले कळ्याची’ या स्वागत गीताने उपस्थित प्रेक्षकांची मने वेधली.
यावेळी बोलताना लक्ष्मणरावजी बेडसकर म्हणाले, स्नेहसंमेलना सारख्या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळतो यामधून आदर्श कलाकार घडतात. सर्व सहभागी कलाकारांना पालक खूप चांगल्या प्रकारे प्रोत्साहित करतात असे मत व्यक्त केले.
सहभागी विद्यार्थ्यांनी शेतकरी,धनगर लोकगीत,राजस्थानी घूमर लोकगीत, नाटक मले बाजाराला जायचं माय, कश्मीरी लोकनृत्य,ऐतिहासिक हिरकणी लोकनृत्य,मराठमोळी लावणी नृत्य, सादर केली.पोतराज लोकनृत्य प्रेक्षकांचे विशेष आकर्षण ठरले. मराठी, हिंदी, लोक गीत, गोंधळ, भारुड अशा विविध गीतावर नृत्य सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली. कार्यक्रमाचे नियोजन शाळेच्या मुख्याध्यापिका शिवनंदा मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षकवृंद यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रबोधकांत समुद्रे, सहाय्यक कल्याण आदमाने यांनी केले.कार्यक्रमच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले.
