*जगद्गुरु श्री नरेंद्राचार्य महाराज यांचा आंबेजोगाई येथील पादुका दर्शन सोहळ्यामध्ये 55 गोर गरीब व गरजू महिलांना शिलाई मशीनचे वाटप.*

अंबाजोगाई ! प्रतिनिधी

 

अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या दिव्य पादुकांचे दर्शन आंबेजोगाई येथे हजारो भाविक भक्तांनी घेतले सकाळी 8 ते संध्याकाळी 9 वाजेपर्यंत पूर्ण दिवसभर कार्यक्रम सुरू होता.
28 जानेवारी रोजी, मंगळवारी आंबेजोगाई येथे सकाळीच 9 वाजता आंबेजोगाई येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून मिरवणुकीला सुरुवात झाली मिरवणुकी मध्ये समोर बॅन्जो गाडी, त्याच्या पाठी मागे मिरवणुकीचा बॅनर, कलशधारी महिला, निशाण धारी महिला, संबळ पथक, निशाण धारी पुरुष, वासुदेव पथक, 5 घोडे आणि 6 ऊंट यांच्यावर महापुरुषांचे वेगवेगळे देखावे, भाजणी मंडळ, माऊलींचा रथ, 5 ट्रॅक्टर ट्रॉली मध्ये शाळेतील विद्यार्थ्यांचे वेगवेगळे देखावे आणि त्यांच्या पाठीमागे इतर भक्तगण आशि मिरवणूक आंबेडकर चौक मार्गे कार्यक्रम स्थळी बारा वाजता पोहोचली. संत पिठावर आल्यावर स्वामींची आरती करण्यात आली, त्यानंतर बीड जिल्ह्यातील राजकीय मान्यवरांच्या हस्ते गोर गरीब व गरजू महिलांना 55 शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले. त्यानंतर चिठ्ठ्या टाकून भक्तगणातून एका भाविकांची लहान मुलांच्या हाताने चिठ्ठी काढण्यात आली त्यांच्या हस्ते संतपिटावरील गुरु पूजन व मंडप मधील भक्तगणांचे गुरुपूजन झाले, त्यानंतर जनम. प्रवचनकार सौ तनवी मोरे ताईंचे प्रवचन झाले, त्यानंतर सर्व भाविकांना महाप्रसादाची सोय करण्यात आली होती सर्वांनी महाप्रसादाचा आस्वाद घेतला, या कार्यक्रमांमध्ये 406 भक्तगणांनी भक्त दीक्षा घेतल्या त्यानंतर सिद्धपादुकाच्या दर्शना साठी भाविकांच्या लांब पर्यंत रांगा लागल्या होत्या रात्री नऊ पर्यंत दर्शन चालू होते त्यानंतर सिद्ध पादुका पुढील कार्यक्रमासाठी रवाना झाल्या या भव्य दिव्य कार्यक्रमासाठी आयोजक, जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज भक्त सेवा मंडळ आंबेजोगाई व बीड जिल्हा यांच्या वतीने अथक परिश्रम घेण्यात आले आणि कार्यक्रम संपन्न झाला.

 

संपादक दशरथ चवरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *