श्री.छत्रपती शिवरायांच्या चरित्रातून यशाचा मंत्र शिवतंत्र प्रेरणादायी व्याख्यान, सादरकर्ते शिवशाहीर डॉ. विजय महाराज तनपुरे
शुक्रवार रोजी शिवशाहीर डॉ. विजय महाराज तनपुरे यांच्या व्याख्यानाचे आयोजन; व्याख्यानाच्या कार्यक्रमाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे-ह.भ.प. केशव महाराज शास्त्री
केज ! प्रतिनिधी
श्री.छत्रपती शिवरायांच्या चरित्रातून यशाचा मंत्र शिवतंत्र प्रेरणादायी व्याख्यान, सादरकर्ते शिवशाहीर डॉ. विजय महाराज तनपुरे,शुक्रवार रोजी शिवशाहीर डॉ. विजय महाराज तनपुरे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.या व्याख्यानाच्या कार्यक्रमाला केज शहरासह तालुक्यातील व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन ह.भ.प. केशव महाराज शास्त्री व श्रीकृष्ण भक्त परिवार केज यांच्या वतीने करण्यात आले आहे.
याबाबतची सविस्तर माहिती अशी की, वार शुक्रवार दिनांक ३१ जानेवारी २०२५ रोजी दुपारी ३-३० ते ५-३० वा. कार्यक्रमाचे ठिकाण भागवत कथा मंडप, पंचायत समिती मैदान केज येथे श्री छत्रपती शिवरायांच्या चरित्रातून यशाचा मंत्र प्रेरणादायी व्याख्यान यशाचा मंत्र शिवतंत्र सादरकर्ते शिवशाहीर डॉ. विजय महाराज तनपुरे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे आयोजक भगवान श्रीकृष्ण आश्रमाचे संस्थापक अध्यक्ष भागवत भूषण ह.भ.प.केशव महाराज शास्त्री व श्रीकृष्ण भक्त परिवार केज यांच्या वतीने करण्यात आले आहे.
शिवशाहीर डॉ. महाराज तनपुरे रा. श्रीरामपूर पो. ता. राहुरी जि.अहमदनगर त्यांचा जन्म दिनांक २५ डिसेंबर 1१९७२ रोजी आहे त्यांचे शिक्षण बी.ए. झाले आहे. त्यांचे वडील माजी सैनिक, वयाच्या दुसऱ्या वर्षी पोलिओमुळे अपंगत्व आले, आजवर हजारोच्या वर पोवाडे, व्याख्याने, हरी कीर्तनाचे जाहीर कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश, दिल्ली, हैदराबाद अशा अनेक राज्यांमध्ये महाराजांचे चरित्र घराघरांमध्ये पोहोचविण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहिले आहेत.
त्याचबरोबर परदेशात कॉंगो, अखाती देश, दुबई यासह आफ्रिका यासारख्या देशात सात दिवस शिवचरित्र व अध्यात्म यांचा मिलाप करून निर्माण झालेल्या आपल्या राजांचे शिवायण सादर करणारे महाराष्ट्रातील कीर्तनकार महाराज, अपंगत्वावर मात करत महाराष्ट्रा सह परदेशात ही शिव छत्रपतींचा तेजस्वी इतिहास पोचविणारे शिवशाहीर आगामी पुढील ५ वर्षात ४५ देशात कार्यक्रम, मागील दोन वर्षांपूर्वी दिल्ली युनिव्हर्सिटी कडून शाहिरी क्षेत्रात मानद डॉक्टरेट, महाराष्ट्रातील अनेक दिग्गजांच्या हस्ते अनेक महत्त्वाचे पुरस्कार प्राप्त, हिंदुहृदय सम्राट शिवसेनाप्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या अतिशय जवळचे शिवशाहीर तब्बल ४९ वेळा मातोश्रीवर भेट, यासह अनेक उल्लेखनीय कामगिरी करत आहेत त्याचबरोबर कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक दिव्यांगांना कुबड्या, तीन चाकी सायकल तसेच गरज उपयोगी वस्तूचे स्वखर्चातून वाटप करत आले आहेत. कष्ट करा, अपेक्षे शिवाय जीवन जगा, अपयशावर मात करा यश तुमचेच आहे असा मोलाचा मंत्र देणारे शिवशाहीर डॉ. विजय महाराज तनपुरे यांचा थोडक्यात परिचय आहे.
या व्याख्यानाच्या कार्यक्रमाला केज शहरासह तालुक्यातील व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
