केज विकास संघर्ष समितीच्या आंदोलनाला यश

मांजरा नदी पुलाच्या रस्त्याचे काम युद्ध पातळीवर सुरू: दोन महिन्यात काम पूर्ण होणार

केज ! प्रतिनिधी

गेली पाच वर्षे केज विकास संघर्ष समिती ज्या मांजरा पुलाच्या एक किमी रस्त्याच्या मजबुती व डांबरीकरणासाठी पाठपुरावा करत होती. हे काम आंदोलन करताच युद्धपातळीवर सुरू झाले असून येत्या दोन महिन्यात हे काम पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर रस्तारोको आंदोलन मागे घेण्यात आले. या आंदोलणार खासदार बजरंग बप्पा सोनवणे यांनी मध्यस्थीकडून समितीला सहकार्य केले.
खामगांव-पंढरपूर या महामार्गावर मांजरा नदी पूल व पुढे याच रस्त्यावर येरमाळा घाटाखाली असाच खराब रस्त्याचा पॅच मजबुती व डांबरीकरण करावे या मागणीसाठी केज विकास संघर्ष समिती गेली पाच वर्षे उपोषणे, धरणे आंदोलने आणि रास्तारोको सारखे अनेक आंदोलने केली होती. या रस्त्याची अवस्था खूपच वाईट झाल्याने अपघात, रात्रीच्या वेळी चोऱ्या व लूटमारीच्या सततच्या घटनांमुळे नागरिक व वाहनचालक त्रस्त झाले होते. यासाठी केज विकास संघर्ष समितीने 21 जानेवारी रोजी सर्व संबंधित यंत्रणांना निवेदने देऊन 28 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता मांजरानदी पुलावर बेमुदत आंदोलनाचा इशारा दिला होता. या आंदोलनाच्या प्रति समितीने एमएसआरडिसी, कळंब व केज चे तहसीलदार व पोलीस यंत्रणेला दिल्या होत्या. आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर महाराष्ट्र राज्य विकास महामंडळाने (एमएसआरडीसीने) तात्काळ रस्ता दुरुस्तीचे काम दिवस तात्काळ हाती घेतले.मात्र हे काम विहित मुदतीत व तरतुदीप्रमाणे पूर्ण करावे याचे लेखी आश्वासन घेण्यासाठी समितीने दिलेल्या वेळी आंदोलन सुरु केले. यावेळी बीड चे खासदार बजरंग बप्पा सोनवणे आंदोलनस्थळी पोहोंचले व त्यांनी संबंधित अधिकारी वेळेत पोहोंचले नसल्याबद्दल या विभागाला फोन करून चांगलेच धारेवर धरले. त्यांनी त्यांनी समितीने केलेल्या मागणीनुसार हे काम नियमानुसार व वेळेत पूर्ण करण्याच्या सूचनाही संबंधितांना दिल्या. सामाजिक कार्यकर्ते हनुमंत भोसले यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात नासेर मुंडे, संपत वाघमारे, पत्रकार गौतम बचुटे, मुबशीर खतीब, तात्या गवळी यांच्यासह या परिसरातील वाहन चालक व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

संपादक दशरथ चवरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *