मुख्याध्यापक संजय चवरे यांचा मित्रांच्या वतीने सत्कार
केज ! प्रतिनिधी
ज्या शाळेत शिक्षण घेतले त्याच शाळेचा मुख्याध्यापक म्हणून कार्यभार स्वीकारल्यानंतर सेवा करण्याची संधी मिळालेल्या एका मुख्याध्यापकांचा त्यांच्या सर्व वर्गमित्रांनी सत्कार केला.
या बाबतची माहिती अशी की मुख्याध्यापक संजय चवरे हे जिल्हा परिषद माध्यमिक शाळेचे १९८७ च्या बॅचचे विद्यार्थी होते. त्या नंतर ते शिक्षक म्हणून सेवा करीत होते. त्या नंतर सुमारे ३२ वर्षा नंतर संजय चवरे हे त्यांनी ज्या शाळेत शिक्षण घेतले त्याच शाळेचा मुख्याध्यापक म्हणून सेवा करण्याची संधी मिळाली आहे. त्या निमित्त त्यांचे वर्गमित्रांनी एकत्र येवून संजय चवरे यांचा सत्कार केला. त्यासाठी सामाजिक कार्यकर्ते दत्ता बारगजे, राज्याचे औद्योगिक विभागाचे सुरक्षा व आरोग्य संचालक डॉ संतोष नाईकवाडे, प्रसिद्ध कृषी उत्पादनाचे व्यापारी विकास मिरगणे, शासकीय कॉन्ट्रॅक्टर दत्ता देशमुख, इलेक्ट्रॉनिक उत्पादनाचे व्यापारी संजय शेळके, वैद्यनाथ बँकेचे व्यवस्थापक विनोद पोपळे, मुख्याद्यापक बाबासाहेब केदार, महादेव मेटे, बालासाहेब कांबळे, चंद्रकांत पाळवदे, शेख अय्युब, मुरलीधर ठोंबरे, भरत जाधव, वाल्मीक गायकवाड, आशराजी दांगट, इंद्रमोहन कराड, गुलाब उगले, दिगंबर भुतकर, शिवाजी राऊत आणि पत्रकार गौतम बचुटे या मित्रांनी एकत्रित त्यांचा सत्कार केला.
