केज तालुक्यातील 63 ग्रामपंचायत सदस्य अपात्र- जिल्हाधिकारी बीड

केज! प्रतिनिधी

निवडणुकीनंतर जात प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे केज तालुक्यातील सोनिजवळा , नारेवाडी,धोतरा, सुकळी,घाटेवाडी,मु़ढेवाडी,शिंदी,आंधळेवाडी, पैठण,पाथरा,गपेवाडी,वरपगाव,बोरगाव, पळसखेडा,आवसगाव,सोनेसांगवी, लव्हरी, लाडेगाव,एकुरका,सौदना, देवगाव,साळेगाव,केवड, मस्साजोग,सारणी(आ),राजेगाव,पिसेगाव,हादगाव,माळेवाडी,सादोळा,उमरी,शिरूरघाट,आनेगाव,इसथळ,सातेफळ, धनेगाव, सांगवी सारणी,दहीफळ, नाव्होली, टाकळी, नागझरी,पिराचीवाडी,बावची,औरंगपुर, या गावचे ग्रामपंचायत सदस्य जिल्हाधिकारी अविनाश पाठक साहेब यांनी अपात्र ठरवल्याच्या दिलेल्या निर्णयाने केज तालुक्यातील एकच खळबळ उडाली आहे. जिल्ह्यातील सन 2020 नंतर झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच व सदस्य म्हणून निवडून आलेल्या राखीव प्रवर्गातील सदस्यांनी जात वैधता प्रमाणपत्र दाखल करण्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयालाकडुन वारंवार सुचना देऊन ही जात वैधता प्रमाणपत्र दाखल न करणार्या सदस्यांना अपात्र ठरवण्याचा निर्णय जिल्हाधिकारी यांनी घेतला असून केज तालुक्यातील 63 ग्रामपंचायत सदस्यांना जिल्हाधिकारी अविनाश पाठक साहेब यांनी अपात्र ठरवले आहे. जिल्हाधिकारी यांच्या या निर्णयामुळे केज तालुक्यातील राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे

संपादक दशरथ चवरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *