जनविकास परिवर्तन आघाडीच्या वतीने हळदी कुंकू महोत्सवास आज शनिवारपासून प्रारंभ-सौ. सीताताई बनसोड
शहरातील माता व भगिनींनी हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा-हरूणभाई इनामदार
केज/प्रतिनिधी
जनविकास परिवर्तन आघाडीच्या वतीने हळदी कुंकू महोत्सवास शनिवारपासून प्रारंभ करण्यात येत आहे तरी शहरातील महिलांनी या कार्यक्रमांमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन नगराध्यक्षा सौ. सीताताई बनसोड व जनविकास परिवर्तन आघाडीचे प्रमुख हारुणभाई रुणभाई इनामदार यांनी केले आहे.
याबाबतची सविस्तर माहिती अशी की, गेल्या अनेक वर्षापासून जनविकास परिवर्तन आघाडीच्या माध्यमातून व हारुणभाई इनामदार यांच्या संकल्पनेतून केज शहरांमध्ये नारी महोत्सव आयोजित करण्यात येत आहे यामध्ये महिलांसाठी हळदीकुंकवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे त्याचाच एक भाग म्हणून यावर्षी केज नगरपंचायतच्या नगराध्यक्षा सौ.सीताताई बनसोड यांच्या मार्गदर्शनाखाली हळदी कुंकू महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
केज शहरातील माता भगिनी या माझ्या कुटुंबाच्या घटक आहेत त्यांचा सन्मान करण हे आमचे कर्तव्य आहे. या कार्यक्रमामधून महिलांना संवाद साधता यावा व एकमेकांचे हितगुज एकमेकांना साधता यावे असा या कार्यक्रमाचा उद्देश आहे असे हरून भाई इनामदार यांनी माध्यमाशी बोलतानी स्पष्ट केले आहे. पुढे बोलताना इनामदार म्हणाले की, महिला स्वतःच्या व्यवसायात व कुटुंबाच्या कामात व्यस्त असतात व महिलांसाठी मकर संक्रांतीचा सण फार महत्त्वाचा असतो व मला माझ्या माता व भगिनींची सेवा करण्याची एक संधी मिळावी म्हणून केज शहरांमध्ये चार ठिकाणी हळदीकुंकू महोत्सवाचे आयोजन केजच्या कर्तव्यदक्ष नगराध्यक्षा सौ.सीताताई बनसोड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे तरी शहरातील माता व भगिनींनी हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा असे आवाहन हरूणभाई इनामदार यांनी केले आहे.
यावेळी नगराध्यक्षा सौ.सीताताई बनसोड म्हणाल्या की, केज शहरातील सर्व महिलांना आमच्या जनविकास परिवर्तन आघाडीच्या वतीने हाळदी कुंकू महोत्सवामध्ये सहभागी व्हावे याकरिता आम्ही शहरातील चार ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे तरी सर्व महिला भगिनींनी या कार्यक्रमाचा लाभ घेण्याकरिता मोठ्या संख्येने उपस्थित राहावे अशी त्यांनी सर्वांना विनंती केली आहे.
पुढे बोलताना बनसोड म्हणाल्या की, हळदी कुंकू महोत्सव हा शनिवार दिनांक २५ जानेवारी २०२५ रोजी ठीक दुपारी २-०० वाजता शहरातील महात्मा फुले नगर भागातील जे.के. फंक्शन हॉल येथे सुरुवात करण्यात येणार आहे या कार्यक्रमास वार्ड क्रमांक ६, ७, ८ व ९ मधील महिलांनी सहभागी व्हावे. रविवार दिनांक २६ जानेवारी रोजी दुपारी २-०० वाजता नगरपंचायत कार्यालय येथे या परिसरातील महिलांनी कार्यक्रमास उपस्थित राहावे.
सोमवार दिनांक २७ जानेवारी रोजी दुपारी २-०० वाजता मुक्ताई मंगल कार्यालय धारूर चौक येथे या परिसरातील महिलांनी कार्यक्रमास उपस्थित राहावे.
बुधवार दिनांक २९ जानेवारी रोजी दुपारी २-०० वाजता जय भवानी कन्या प्रशाला कानडी रोड या ठिकाणी या भागातील महिलांनी कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन नगराध्यक्षा सौ.सिताताई बनसोड यांनी केले आहे.
