केजचे भूमिपुत्र हारूणभाई इनामदार यांना २०२५ चा सर्वोच्च श्री वैद्यनाथ रत्न पुरस्कार जाहीर

परळी येथे २३ फेब्रुवारी रोजी मान्यवरांच्या हस्ते हारुणभाई इनामदार यांना पुरस्काराने सन्मानित

केज! प्रतिनिधी

केजचे भूमिपुत्र हारूणभाई इनामदार यांना २०२५ चा सर्वोच्च श्री वैद्यनाथ रत्न पुरस्कार जाहीर झाला आहे तर परळी येथे २३ फेब्रुवारी रोजी मान्यवरांच्या हस्ते हारुणभाई इनामदार यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
केज येथील जनविकास परिवर्तन आघाडीचे प्रमुख तथा समाजसेवेचा वसा घेतलेले हारुभाई इनामदार यांना पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांना दि.वा. संस्थान परळी वैजिनाथ यांच्या वतीने देण्यात येणारा सर्वोच्च श्री.वैद्यनाथ रत्न २०२५चा पूरस्कार जाहीर झाला आहे. सदर पुरस्कार हा २३ फेब्रुवारी २०२५ रोजी एका भव्य दिव्य कार्यक्रमांमध्ये मान्यवरांच्या शुभहस्ते देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
केजचे भूमिपुत्र हारून भाई इनामदार हे गेले वीस ते पंचवीस वर्षापासून सामाजिक, राजकीय क्षेत्रामध्ये सतत अग्रेसर राहून त्यांनी सतत आठर पगड जातीच्या समाज बांधवांची नाळ जोडून समाजकार्य व राजकीय क्षेत्रामध्ये अग्रेसर राहून गोरगरिबांचे अनेक प्रश्न मार्गी लावलेली आहेत.
दि. वा. सेवा संस्थान परळी वैजनाथ हे संस्थान गेले पन्नास वर्षापासून सामाजिक क्षेत्रासह विविध क्षेत्रांमध्ये काम करत आहे त्याचबरोबर सर्व धर्मीय विवाह सोहळ्याचे काम देखील मोठ्या प्रमाणात हे संस्थान करत आहे. या संस्थांच्या वतीने दर तीन वर्षातून एकदा पंचक्रोशीती वैद्यनाथाच्या नावाने दिला जाणारा सर्वोच्च श्री वैद्यनाथ रत्न २०२५ हा सर्वोच्च पुरस्कार आजपर्यंत ज्या व्यक्तीने समाजकार्यामध्ये उत्कृष्ट कार्य केले अशा व्यक्तींना सदर पुरस्कार देण्यात येत आहे. या संस्थानाने इनामदार यांच्या कार्याची दखल घेत त्यांना २०२५ चा सर्वोच्च श्री वैद्यनाथ रत्न पुरस्कार जाहीर केला आहे. सदर संस्थानाच्या वतीने इनामदार यांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली या निवडीचे पत्र संस्थानाचे अध्यक्ष दीपक वांजरखेडे यांनी इनामदार यांना दिले आहे.
हारुणभाई इनामदार यांना पुरस्कार जाहीर झाल्यामुळे सध्या त्यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. शिवाय केज शहरातील अनेक मान्यवरांसह विविध संस्थांनी त्यांचा सत्कार करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

संपादक दशरथ चवरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *