जनविकास परिवर्तन आघाडीच्या जाहीरनाम्यातील वचनपूर्ती कडे वाटचाल-हारुणभाई इनामदार

केज ! प्रतिनिधी

केज-कळंळ रोड लगत शहरातील प्रभाग ८ मधील रस्ते नाली बांधकामासह विविध विकास कामाचे श्रीफळ फोडून उद्घाटन करून प्रत्यक्षात कामास सुरुवात करण्यात आली आहे.
माध्यमाशी बोलताना जनविकास परिवर्तन आघाडीचे प्रमुख हारूणभाई इनामदार यांनी सांगितले की, केज नगरपंचायत च्या निवडणुकीच्या वेळी जनविकास परिवर्तन आघाडीने जाहीरनामेच्या माध्यमातून दिलेले वचन आम्ही आज रोजी पूर्ण करत आहोत व त्या वचनपूर्ती कडे वाटचाल करीत आहोत.
प्रभाग क्रमांक आठ मधील रस्ते नाली च्या कामासह विविध कामे गेल्या अनेक वर्षापासून अद्यापही झालेली नव्हती या भागामध्ये नागरिक मोठ्या प्रमाणामध्ये रहिवास करत आहेत. निवडणुकीच्या वेळी जनविकास परिवर्तन आघाडीने या भागातील नागरिकांना शब्द दिला होता की, केज नगरपंचायत च्या माध्यमातून आमची सत्ता आल्यानंतर आम्ही या भागातील विकास कामे करू त्याचाच एक भाग म्हणून केज-कळंब रोडवरील हॉटेल लोकसेवा पासून जुना चिंचोली रस्त्याचे व नालीच्या बांधकामासह या भागातील अनेक रस्ते व विविध विकास कामाची श्रीफळ फोडून सुरुवात करण्यात आली आहे.
केज नगरपंचायतच्या माध्यमातून या भागातील विकास कामे मंजूर करून आणून कामास सुरुवात केल्याबद्दल जनविकास परिवर्तन आघाडीचे प्रमुख हारुणभाई इनामदार, नगराध्यक्षा सौ. सीताताई बनसोड, गटनेते राजूभाई इनामदार, नगरसेवक जलालभाई इनामदार यांचा या भागातील नागरिकांनी शाल, पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला.
कामाचा शुभारंभ उपस्थित मान्यवर व या भागातील नागरिक यांच्या हस्ते श्रीफळ फोडून प्रत्यक्षात कामास सुरुवात करण्यात आली.
यावेळी बोलताना इनामदार म्हणाले की, आम्ही केज शहराच्या विकास कामासाठी कटिबद्ध आहोत व आमच्या जनविकास परिवर्तन आघाडीने निवडणुकीच्या वेळी दिलेल्या जाहीरनाम्याप्रमाणे आम्ही केज वासियांची सेवा करण्यासाठी कटिबद्ध आहोत. येणाऱ्या काळातही या भागातील उर्वरित कामे आम्ही लवकरच मार्गी लावू असे बोलताना इनामदार यांनी सांगितले आहे.
यावेळी बोलताना नगराध्यक्षा सौ. सीताताई बनसोड म्हणाल्या की, प्रभाग क्रमांक आठ हा गेल्या अनेक दिवसापासून विकास कामापासून वंचित होता परंतु जनविकास परिवर्तन आघाडीच्या माध्यमातून केज नगर पंचायतची सत्ता आमच्या हाती येताच या भागातील अनेक कामे मार्गे लावण्यासाठी प्रयत्न केले. या भागात अनेक ठिकाणी रस्ते नाल्या सह विविध कामे आम्ही पूर्णतत्त्वाकडे घेऊन जात आहोत आज रोजी या भागात अनेक कामे पूर्ण झालेले आहेत.
यापुढेही उर्वरित या भागातील राहिलेले कामे लवकरच पूर्ण करणारा आहोत असे त्यांनी उपस्थितू अश्वशित केले आहे.
यावेळी जनविकास परिवर्तन आघाडीचे प्रमुख हारुणभाई इनामदार,नगराध्यक्षा सौ.सीताताई बनसोड, गटनेते राजूभाई इनामदार,नगरसेवक जलालभाई इनामदार, जनविकास सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रमेश भिसे, खाजाभाई तांबोळी, बशीरभाई इनामदार, फिरोज टेलर, रसूल टेलर, फारूक इनामदार, मुझे पठाण, ॲड. वसिम शेख, नखाते मेजर, सय्यद सलीम, विवेक बनसोड, बप्पा लांडगे, आखिब शेख, जमलोदिन फारुखी, नौशाद शेख यांच्यासह जनविकास परिवर्तन आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते व या भागातील नागरिक उपस्थित होते.

संपादक दशरथ चवरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *