घेवडा,राजमा, पावटा,चे भाव घसरल्याने  शेतकरी चिंतेत.

केज! प्रतिनिधी.

रब्बी हंगामात राजमा पिकाने मागच्या चार-पाच वर्षांपूर्वी बीड व धाराशिव जिल्ह्यातील भागात दमदार एन्ट्री केली होती. हे नवे पीक रब्बी हंगामातील ‘क्रॉप पॅटर्न’ बदलाची नांदी ठरत असून एकट्या केज, कळंब व वाशी तालुक्यात एकूण रब्बी क्षेत्रात राजम्याचा पेरा वाढला आहे.राजमा हे
उत्तर भारतातील उत्तरांचल, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, पंजाब, दिल्ली, चंदीगड अशा प्रांतात आहारात रुजलेला हा राजमा मागच्या चार वर्षांत केज तालुक्यातील हनुमंत पिंपरी, नांदूर घाट, युसुफ वडगाव,विडा चिंचोली माळी, मस्साजोग,या महसूल मंडळातील नाहोली, हनुमंत पिंपरी,काळेगाव घाट,केवड सह तालुक्यातील अनेक गावांमध्ये 15 हजार हेक्टर क्षेत्रावर क्षेत्र वाढले आहे,कळंब तालुक्यातील इटकूर, सारोळा, वाशी तालुक्यात सुद्धा क्षेत्र वाढले आहे आहे. या गावांनी प्रथम राजमा पीक घेतले अन् यशस्वी करून दाखवले आहे .
यंदा केज , कळंब तालुक्यातील सह इतर भागात तालुक्यात चांगला पाऊस झाला. यामुळे रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी पारंपरिक हरभरा, ज्वारी, गहू या पिकासोबत रब्बी हंगामात राजमाची पेरणी केली . हा राजमा नाहोली,इटकूर, सारोळा ,मांडवा येथून दिल्ली मार्केटला जातो. तेथील मार्केटमध्ये या भागाचा चांगलेच नाव झाले आहे . ईटकुर सारोळा ,नाहोली सीड मार्केट आहेत या ठिकाणी शेतकऱ्यांकडील राजमाची मोठी खरेदी केली जाते.मागील तीन-चार वर्षांमध्ये या भागातील शेतकऱ्यांनी चांगल्या प्रकारे पीक घेतले त्यात त्यांचा फायदाही झाला त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात राजमाचे क्षेत्र वाढवले आहे. चालू हंगामातील पीक हे मार्केटला येत आहेत सुरुवातीला वरून, वाघा इतर वरायटींना चांगला भाव मिळत होता मात्र त्याला गेल्या आठवड्यामध्ये जसं- जशी आवक वाढली तसे राजमाचे क्विंटल मागे जवळपास 2 हजाराने भाव पडलेले आहेत. सध्या वरुन 5500, वाघा 7500 या दराने खरेदी केली जात आहे. शेतकऱ्यांना महागाचे बियाणे ,खते औषध फवारणी असा महागडा खर्च करावा लागला असून आता पडलेल्या भावामुळे शेतकरी चिंतेत आहे यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याची चर्चा शेतकऱ्यां मध्ये आहे.

हे भाव स्थानिक च्या व्यापाऱ्यांनी पाडले नसून वरच दिल्ली मार्केट मधून भाव कमी झाले आहेत.
जर शेतकऱ्यांनी टप्प्याटप्प्याने माल विक्री केला, आवक कमी झाली तरच भाव वाढू शकतात.

टिंगरे बंधु

– पवनसुत ट्रेडिंग कंपनी सुर्डी फाटा अंबाजोगाई,कळंब रोड

 

दोन एकर क्षेत्रात राजामा पेरणी केली आहे,राजमा काढणी चालू आहे,राजामा बियाणे ,खत, कीटकनाशके फवारणी, पाणी व्यवस्थापन मोठा खर्च राजमा पिकासाठी करावा लागतो , अशातच भाव कमी झाले आहेत.”

मुकुंद गायकवाड 
शेतकरी सोनिजवळा .

संपादक दशरथ चवरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *