दर वर्षीप्रमाणे याही वर्षी सोनीजवळा गावकरी मंडळी तर्फे चंपाषष्टी निमित्त खंडोबा यात्रेचे नियोजन सोमवार २, डिसेंबर ते शनिवार ७, डिसेंबर केले आहे यात्रेनिमित अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे तरी भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन समस्त ग्रामस्था मंडळी सोनीजवळा यांचे तर्फे करण्यात आले आहे यात्रेतील कार्यक्रम पुढील प्रमाणे, शुक्रवार दि ६, डिसेंबर रोजी सायंकाळी ८ ते ११ या वेळी अमोलराजे म्युझीकल नाईट आ र्केस्ट्रा यांचा बहारदार कार्यक्रम होईल शनिवार दि.७, डिसेंबर रोजी सायंकाळी ८ ते ११ जय मल्हार वारू ग्रुप पार्टी, तसेच गावकरी मंडळी तर्फे भव्य मिरवणूक होईल, दुपारी ४, वाजता महाप्रसादाचा कार्यक्रम होईल संध्याकाळी ७, वाजता शोभेची दारु उडवण्याचा कार्यक्रम होईल व नंतर सायंकाळी ८, वाजता सुप्रसिद्ध शिवमल्हार जागरण पार्टी यांचा वाघ्या मुरळी चा कार्यक्रम होईल तरी पंचक्रोशीतील सर्व भाविकभक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक, समस्त गावकरी मंडळी सोनि जवळा यांच्या वतीने करण्यात आले आहे.