खंडोबाचा येळकोट येळकोट जय मल्हार 

केज! प्रतिनिधी

केज येथे चंपाषष्ठी निमित्त लंगर तोडण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता
केज येथील अहिल्या नगर भागातील प्रसिद्ध खंडोबां मंदिर देवस्थानात चंपाषष्ठी निमित्त लंगर तोडणे, वाघ्या – मुरळी, गोंधळी, वारूवाले, आराधी मंडळ यांचे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते, यावेळी
केज शहरातील खंडोबा मंदिर परिसरामध्ये चंपाषष्ठी निमित्त वारू, आराधी असे प्रत्येक वर्षी विविध कार्यक्रम होतात, लंगर तोडला जातो, वारू वाले वसारी खेळतात आराध्याचे गाणे होतात आणि चंपाषष्ठी दिवशी मोठा भंडारा म्हणजेच, महाप्रसादाचा कार्यक्रम होतो. यावेळी बिबीशन गाढवे ( आण्णा ) शिवाजी चपट, चंद्रकांत गुंड,सचिन रांजणकर, बालासाहेब भुतकर, अमोल रोडे, अमोल सौदागर,कृष्णा रोडे, संभाजी रोडे, आबा लांडगे, सुखदेव लांडगे, रोहिदास गाढवे,रमेश पारवे, नंदू पौळ, नवनाथ कोकाटे,काशिनाथ रोडे, गव्हाणे व इतर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संपादक दशरथ चवरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *