*जीवन शिक्षण अस्थिव्यंग विद्यालयात दिव्यांग दिन उत्साहात साजरा.*
केज ! प्रतिनिधी
केज येथील जीवन शिक्षण निवासी अस्थिव्यंग विद्यालयात 3 डिसेंबर जागतिक दिव्यांग दिन उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी दिव्यांगासाठी विशेष कार्य करणाऱ्या डॉ.हेलन केलर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
दिव्यांग दिनाचे औचित्य साधून शाळेमध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले.आरोग्य तपासणीसाठी प्रमुख पाहुणे डॉ.शिवाजी ठोंबरे तर कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे सचिव मा.हारुणभाई इनामदार साहेब लाभले होते.डॉ.शिवाजी ठोंबरे यांनी दिव्यांग विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करून, वैयक्तिक स्वच्छता कशी ठेवावी व गुड टच-बॅड टच संदर्भात मोलाचे मार्गदर्शन केले.तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. हारून इनामदार साहेब यांनी दिव्यांग विद्यार्थ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी व समाजात सन्मान मिळवून देण्यासाठी अखंड प्रयत्न करत राहू असा विश्वास दिला.तसेच दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांग विद्यार्थ्यांचे चित्रकला स्पर्धा,रांगोळी स्पर्धा व व्हील चेअर रेस, थ्रो सॉफ्ट बॉल,व्हील चेअर गोळा फेक, मनोरंजनात्मक खेळ असे उपक्रम घेण्यात आले.या कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक श्री.विनायक ठोंबरे सर,विशेष शिक्षिका कल्पना थोरात मॅडम,कला शिक्षक मंगेश मोरे सर, क्रिडा शिक्षक शंकर तोंडसे सर,अधिक्षक धोंडगे सर,सर्व शिक्षकेत्तर कर्मचारी व दिव्यांग विद्यार्थी उपस्थित होते.
