हेआर आशान कसा रस्ता टिकायचा …

पहिला प्रयोग केज तालुक्यातील सोनीजवळा रस्त्यावर

केज ! प्रतिनिधी

केज शहरातून केजडी नदीपासून गेलेला सोनीजवळा रस्ता खड्डे पडून खराब झालेला आहे. या खड्ड्यात निवडणुकीच्या धामधुमीत मुरुम मिक्स करुन खडी भरण्यात आली आहे. खड्डे भरताना खड्याला डांबराचा वास देखील दिला नाही आगदी नवीन पद्धतीने हे खड्डे भरण्यात आले आहेत परंतु खड्डे भरून काही दिवस होतात ना होतात तर त्या मुरमाचा फुपाटा होऊन ती खडी आता बाहेर येऊ लागली आहे लवकरच ते खड्डे पुन्हा वाहनधारकांना त्रास देतील म्हणून संबंधित यंत्रणेला आवश्यक त्या सुचना दिल्या तर डांबर आणि खडीने खड्डे व्यवस्थीत भरुन नंतर त्यावर पुढील काम होईल . याकडे संबंधित अधिकारी यांनी लक्ष दिले नाही तर पुढील बजेट कधी मिळेल आणि तोपर्यंत वाहनधारकांचे काय हाल होतील याचा विचार देखील न केलेला बरा आशा प्रतिक्रिया या भागातील नागरीक व वाहनचालकांमधुन येतात.

 

हा सर्व प्रकार पाहून खड्डे भरण्यासाठी आलेल्या या नवीन फॉर्म्युल्याची या भागामध्ये चवीने चर्चा सुरू आहे.

संपादक दशरथ चवरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *