*ही जोडी पृथ्वीराज साठे यांच्या विजयाची शिलेदार ठरणार… !*
केज ! प्रतिनिधी
केज विधानसभा मतदारसंघात पृथ्वीराज साठे यांचा विजय निश्चित मानला जात आहे आणि या विजयाचे अनेकजण शिलेदार म्हणून पहायला मिळणार आहेत. त्यापैकी हारुणभाई इनामदार आणि नगराध्यक्षा सीता बनसोड या जोडीचा नामोल्लेख अग्रक्रमाने केला जाईल. या निवडणुकीत पृथ्वीराज साठे यांना आमदार करण्यासाठी अनेकजण आपापल्या परीने सरसावले होते. अनेकांनी तर जमेल तशी नगदी आर्थिक मदत देखील साठे यांना केलेली आहे. अगदी शेतकऱ्यांनी देखील लाख पन्नास रुपये देऊन पृथ्वीराज साठे यांची प्रचार यंत्रणा सक्षमपणे चालावी यासाठी मदत केलेली आहे. निवडणूक म्हटले की रोटी बोटी आणि चपटी हे समिकरण असले तरी लोकांनी साठे यांचेकडून कसलीच अपेक्षा न करता जमेल तसा प्रचार करुन त्यांच्या विजयाचा शिलेदार होण्यासाठी मनोभावे प्रयत्न केलेला आहे. यामुळे उद्या पृथ्वीराज साठे यांचा विजय जाहीर झाल्यानंतर अनेकजणांना या विजयाचे शिलेदार मानले जाणार असले तरी त्यामध्ये जनविकास परिवर्तन आघाडीचे सर्वेसर्वा हारुणभाई इनामदार आणि नगराध्यक्षा सीता बनसोड यांचा आवर्जून उल्लेख होईल. कारण हारुणभाई इनामदार यांनी नगराध्यक्षा सीता बनसोड मॅडम यांना आमदार करायचेच असा निर्धार करुन प्रचंड मोठी तयारी केली होती. केज शहराबरोबरच अंबेजोगाई आणि नेकनूर या मोठ्या शहरांमध्ये मोठी तयारी केली होती. लोकांशी संवाद साधून त्यांची मनं जिंकली होती. नगराध्यक्षांना आमदार करण्याचा त्यांनी विडाच उचलला होता. मराठा आरक्षण योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांच्याकडून ते लढणार होते. पाटलांनीही त्यांच्या उमेदवारीला हिरवा कंदील दाखवला होता. टिव्ही चॅनलवर देखील सीता बनसोड मॅडम यांच्या उमेदवारीच्या न्यूज झळकल्या होत्या परंतु नंतर अचानकपणे दादांनी निवडणुकीत भाग घ्यायचा नाही असे जाहीर केले आणि महाराष्ट्रातील सर्व जरांगे पाटील समर्थक अपक्षांना आपआपली उमेदवारी परत घ्यायला सांगितले. यामुळे हारुणभाई इनामदार यांनी देखील बनसोड यांची उमेदवारी मागे घेतली. हारुणभाई इनामदार यांनी उमेदवारी मागे घेतली परंतु नंतर त्यांनी त्यांच्या सर्व समर्थकांना बोलावून पुढील राजकीय रणनीती आखली आणि सर्वानुमते या निवडणुकीत पृथ्वीराज साठे यांना आमदार करायचेच असा निर्धार केला. या बैठकीत साठे यांना बोलावून जाहीर पाठिंबा देखील दिला आणि जाहिर प्रचारसभा देखील घेतल्या. आता केज मतदारसंघात परिवर्तन करायचेच. या मतदारसंघातील जुलमी राजवट संपवायचीच आणि त्यासाठी पृथ्वीराज साठे यांना तन मन धन लावून विजयी करायचे म्हणून ते कामाला लागले. प्रचार काळात उमेदवारापेक्षाही त्यांची अधिक गती दिसून येत होती. शहरात आणि गाव खेड्यात जाऊन त्यांनी सभा घेतल्या, बैठका घेतल्या आणि लोकांची मने जिंकली. केज शहरामध्ये तर मतदानादरम्यान त्यांनी केलेले नियोजन पाहून त्यांच्या कामाचे कौतुक केले जात होते . मतदानासाठी मतदान केंद्रावर जाण्यासाठी त्यांनी रिक्षांघे केलेलें नियोजन देखील पाहण्यासारखे होते विरोधकांनी देखील याकडे विशेष लक्ष देऊन त्यांच्या या नियोजणाचे निरक्षण केले आणि काहिजणांनी तर मोठी आगपाखड केली. विद्यमान आमदारांना प्रचंड विरोध करत पृथ्वीराज साठे यांच्या विजयासाठी आपल्या जीवाचे रान करणारी जोडी म्हणून हारुणभाई आणि बनसोड मॅडम यांची नोंद मतदारसंघाने घेतली आहे. पृथ्वीराज साठे यांनी विजयी व्हावे म्हणून त्यांचेवर प्रेम करणार्या प्रतेकाने फुल नाही फुलाच्या पाकळीची तरी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत केलेली आहे यामुळे साठे यांचा विजय रोखण्यामधे विरोधकांना यश येणे शक्य दिसत नाही. हारुणभाई इनामदार आणि नगराध्यक्षा सीता बनसोड या जोडीने तन मन धनाने केलेल्या कामाची चर्चा मतदारसंघात आहे. जनतेनेच हि निवडणूक हाती घेतली होती यामुळे या मतदारसंघातील सर्वसामान्य जनता देखील या विजयाचे शिलेदार आहेत. उपाशी तापाशी प्रचार करणारे साठे साहेबांना आमदार होण्यासाठी तहान भुक हरवलेले अनेक जिवाचे कार्यकर्ते देखील या विजयाचे शिल्पकार असणार आहेत. पाच हजार , दहा हजार, पन्नास हजार, एक लाख रुपये मदत करणारे सुद्धा अनेकजण पृथ्वीराज साठे यांना देवदुत म्हणून या निवडणुकीत मिळाले आहेत त्यांच्याही कामाचे कौतुक होत आहे परंतु स्वतः ला आमदार होता आले नाही तर आता साठे साहेबांनाच आमदार करायचं म्हणून दिवसरात्र नगराध्यक्षा सीता बनसोड मॅडम प्रचारात सामिल दिसल्या आणि हारुणभाई इनामदार यांनीही कसलीही अपेक्षा न ठेवता अनेक बैठका घेतल्या, अनेक मेळावे घेतले आणि अनेक सभा गाजवल्या आहेत. स्वतः पुढाकार घेऊन लोकांचा प्रतिसाद मिळवला त्यांना काय हवं काय नको ते पण पाहिलं यामुळे या जोडीचा देखील साठे यांच्या विजयामधे मानाचा वाटा असणार आहे असी चर्चा केज शहरामध्ये आणि मतदारसंघांमध्ये होत आहे.